Panjim Smart City: स्मार्ट सिटी’वर नगरसेवकांकडूनच टीका

समाजमाध्यमांचा वापर : खोदकामाची छायाचित्रे अपलोड करीत खदखद व्यक्त
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak

Panjim Smart City: पणजीत स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (साबांखा) विविध कामे सुरू आहेत. त्यात स्मार्ट सिटीची युनिव्हर्सल आणि स्मार्ट रस्ते बनविण्याची कामे चालली आहेत. साबांखाकडून मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे सुरू असलेल्या खोदकामाची आणि आपापल्या प्रभागात आलेली अवकळा दर्शविणारी छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकून त्यावर खदखद व्यक्त करण्याचा पायंडा नगरसेवकांनी पाडला आहे.

प्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त करण्यापेक्षा समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपली मते संबंधित यंत्रणेकडे किंवा राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचविण्यावर नगरसेवकांचा अधिक भर दिसतो. त्यातही काही मोजकेच नगरसेवक अशा छायाचित्रांवर आपली मते व्यक्त करतात.

त्यात प्रामुख्याने सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर यांच्यासारखे विरोध करणारे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अधिक परखडपणे व्यक्त होताना दिसतात. विशेष बाब म्हणजे सत्ताधारी नगरसेवकच त्यांच्या प्रतिक्रियांवर अधिक चर्चा करतात.

Panjim Smart City
Goa Taxi: वर्षभरात 1,000 बेरोजगार युवकांना टॅक्सी देणार, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो

जाब विचारण्याचे धाडस नाही-

सत्ताधारी नगरसेवक व महापालिका अधिकारी, कर्मचारी असा आणि सर्व नगरसेवकांचा असा वेगवेगळा व्हॉट्अप ग्रुप आहे. त्याशिवाय काही माजी नगरसेवकांचेही व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. त्यातून दररोज विविध प्रभागांतील छायाचित्रे अपलोड होतात.

त्यावर नगरसेवक, शहरातील नागरिक व्यक्त होतात. विशेष बाब म्हणजे उघडपणे व्यक्त होण्याची किंवा महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे धाडस मात्र कोणी करीत नाही, यामागे अनेक कारणे असल्याचे नगरसेवकच सांगतात.

Panjim Smart City
Religious Traditions: ऐतिहासिक उत्‍सवाचा जल्लोष!

काहीजण ‘सेफ मोड’मध्ये-

मळ्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेची छायाचित्रे असोत की मागील पाच ते सहा घटनांत खड्ड्यात रुतलेले ट्रक, टँकर यांची छायाचित्रे असोत, त्यावर मजेशीर कमेंट करणारेही काही नगरसेवक आहेत. परंतु अनेकजण त्यांच्याच प्रभागातील छायाचित्रांवरही व्यक्त होत नाहीत. हे नगरसेवक ‘सेफ मोड’मध्ये राहणेच अधिक पसंत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com