टीका करणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी ः सोपटे

Nivruti Shirodkar
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

वागातोर येथील रेव्ह पार्टीच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करून त्यात सहभागी असलेल्यांना अटक केली आहे. त्याबद्दल पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन.

मोरजी

मात्र, विरोधक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोणताही अभ्यास न करता जुने फोटो सामाजिक माध्यांमाद्वारे व्हायरल करून सरकारवर टीका करणाऱ्यांनी ड्रग्सशी संबध जोडू नये, विरोधकांचेही कपिल झवेरी यांच्याबरोबर फोटो आहेत, तेही फोटो सामाजिक माध्यमात व्हायरल करून आम्हीही आहोत का ड्रगच्या सोबतीला असा सवाल विरोधकांनी स्वतःला विचारावा. विनाकारण टीका करणाऱ्या विरोधकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची जाहीर माफी मागावी, असे आवाहन आमदार तथा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन दयानंद सोपटे यांनी मांद्रे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
वागातोर येथील रेव्ह पार्टीमध्ये जे कोणी सहभागी झाले त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात अभिनेता कपिल झवेरी यालाही पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याच्या सोबतचे आमचे जुने फोटो व्हायरल करून करून जनतेचे मन विचलित करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, रोहन खंवटे, विजय सरदेसाई, रमाकांत खलप यांच्या सोबतही आहे कपिल झवेरी याचे फोटो आहेत. त्याचाही ड्रग्सशी संबध आहे का याचा खुलासा माजी मंत्री विनोद पालयेकर आणि गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी करण्याची मागणी आमदार दयानंद सोपटे यांनी केली.

चतुर्थीच्या शुभेच्छा
सुरवातीला आमदार दयानंद सोपटे यांनी गोमंतकीयांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा देताना सर्व गोमंतकीयांनी कोरोनावर मात करून संकट मुक्त करण्यासाठी ही चतुर्थी महत्वाची आहे. कोरोनावर मात करण्यासाठी विघ्नहर्त्या देवाने शक्ती देवून या महामारीचे हरण करावे अशाप्रकारची प्राथनाही त्यांनी केली.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या