मांगूरहील येथिल डॉ. बाबासाहेबांचा पुतळा हलविल्यामुळे नाराजी

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मांगूरहील येथे उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उपजिल्हाधिकारी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत सोमवारी हलविण्यात आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दाबोळी : मांगूरहील येथे उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उपजिल्हाधिकारी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत सोमवारी हलविण्यात आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मांगोरहिल भाग दाट लोकवस्ती आहे. येथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. येथील गुरुद्वार मंदिराजवळील उघड्या जागेच्या ठिकाणी काहींनी डॉ. आंबेडकर यांचा अर्धपुतळा उभारला होता. 

या विषयीची तक्रार उपजिल्हाधिकारी कार्यालयात आली असता रात्री उशिरा उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, मामलेदार धीरेन बाणावलीकर, तलाठी हनुमांत मांजरेकर तसेच पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई व पोलिसांनी येथे येऊन पाहणी केली. 

गोव्यातील आमठाणे धरण फुल्ल; पण मगरीचा वावर असल्याने भीती 

हा भाग मुख्य रस्त्यावर असल्यामुळे वाहतूक रहदारीचा विचार करून तसेच हा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आल्याने तो पोलिसांच्या सहकार्याने हलविण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

गोवा फॉरवर्ड पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर 

संबंधित बातम्या