फातोर्डा तळीवर गर्दी

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

फातोर्डा येथील दामोदर तळीमध्ये रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून मडगाव व परिसरातील सार्वजनिक गणपती तसेच इतर घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला सुरवात झाली. मात्र, हे विसर्जन पाहण्यासाठी व गणेशाचे दर्शन घेण्यासाठी तळीच्या परिसरात व रस्त्यावर दुतर्फा लोकांची गर्दी झाली. 

फातोर्डा:  फातोर्डा येथील दामोदर तळीमध्ये रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून मडगाव व परिसरातील सार्वजनिक गणपती तसेच इतर घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला सुरवात झाली. मात्र, हे विसर्जन पाहण्यासाठी व गणेशाचे दर्शन घेण्यासाठी तळीच्या परिसरात व रस्त्यावर दुतर्फा लोकांची गर्दी झाली. 

काही प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील प्रतिनिधी तसेच विसर्जन करण्यास आलेल्या इतरांनी सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच तोंडाला मास्क बांधून नियमांचे पालन केले. विसर्जनावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 

फातोर्डा तळीत पिंपळकट्टा, पोलिस सार्वजनिक गणपतीचे वसर्जन करण्यात आले. एरव्ही ही दोन्ही मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन खारेबांद येथे होत असे. यंदा प्रथमच फातोर्डा तळीवर कसलाही गाजावाजा न करता, दारुकामाची आतषबाजी न होता व मिरवणुकीविणे विसर्जन करण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत तळीवर विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती.

आके व ओल्ड कॉलेज सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन दवर्ली येथील तळीत विसर्जन करण्यात आले. आके सार्वजनिक गणेशाचे विसर्जन करताना क्रेनचा वापर करण्यात आला. यंदा करोना महामारीमुळे जास्तीत जास्त लोकांनी केवळ दीड दिवसाचीच गणेशचतुर्थी साजरी केली. 

मडगाव येथील समर्थगड श्रीगणेश २१ दिवसाचा व टेलिफोन कचेरीचा अकरा दिवसांचा साजरा होत आहे. यंदाची चतुर्थी साध्यापणाने, कसलाही गाजावाजा न करता फटाक्यांचा व इतर दारूकामाचा वापर न करता साजरी केली.

goa

संबंधित बातम्या