सत्तरीतील ब्रम्हाकरमळी धबधब्यावर पर्यटकांचा धुडगूस

प्रशासनाने बेशिस्त आणि हुल्लडबाज पर्यटकांकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी
Brahmakarmali waterfall
Brahmakarmali waterfallDainik Gomantak

सपना सामंत

वाळपई : नगरगाव पंचायत भागातील प्रसिद्ध ब्रम्हा करमळी धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत असून त्यांना तत्काळ प्रशासनाने आळा घालण्याची गरज आहे.असंख्य पर्यटक रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ह्या धबधब्यावर येत असतात.

धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांपैकी काहीजण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तसेच दारू आणि बियरच्या बाटल्या घेऊन येतात. त्याचबरोबर कर्कश आवाजातील साऊंड सिस्टिमदेखील त्यांच्या बरोबर असते. जंगलातील या धबधब्याच्या बाजूला येऊन पर्यटक जोरजोरात संगीव वाजवून नृत्याचा ठेका धरतात. तसंच चिकन मटणावर ताव मारतात आणि कचरा मात्र धबधब्याशेजारी टाकून निघून जातात.

Brahmakarmali waterfall
मडगावात मालवाहू ट्रक कारवर कोसळला

सध्या धबधब्याच्या आजूबाजूला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेला दिसून येत आहे. यामुळे पर्यावरणास तसेच जंगलातील जनावरांना हानी पोहोचू शकते. याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास गावातील नागरिक पुढे येऊन योग्य ती कृती करतील, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com