मेरी इम्युक्युलेट चर्च येथे चित्रीकरणावेळी पर्यटकांची गर्दी
मेरी इम्युक्युलेट चर्च येथे चित्रीकरणDainik Gomantak

मेरी इम्युक्युलेट चर्च येथे चित्रीकरणावेळी पर्यटकांची गर्दी

कोणतीही पूर्वसूचना ना दिल्याने चर्च परिसरात वाहतूक खोळंबली

पणजी: राज्यात पर्यटकांची संख्या वाढत असून त्यातच रविवारी पणजी परिसरात तीन ‘वेब सीरिज’चे वेगवेगळ्या ठिकाणी शूटींग (Web series Shooting) करण्यात आले. पणजी शहरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या मेरी इम्युक्युलेट चर्च (Immaculate Conception Church Panjim) जवळही चित्रीकरण झाले. हे चित्रिकरण पाहण्यासाठी बहुतांश पर्यटक, तसेच स्थानिकांनी चर्च स्क्वेअर परिसरात (Church Square Area) गर्दी केली. यावेळी सुरक्षारक्षकांचीही तारांबळ उडाली. गर्दीमुळे वाहतुकीचा मात्र बोजवारा उडाला होती.

मेरी इम्युक्युलेट चर्च येथे चित्रीकरण
मामलेदार कार्यालयातून एका दाखलयासाठी चक्क 800 ते 900 रुपये;सामान्यांचे हाल

स्थानिक पोलिस, तसेच वाहतूक पोलिकांचेही नियंत्रण नव्हते. कोणतीही पूर्वसूचना न देता चित्रिकरण करण्यात आले, पोलिस बंदोबस्तही पुरेसा नसल्या कारणाने अनेकांना त्रास सहन करावा लागला. यावेळी गर्दी असताना कोविड-१९ मार्गदर्शन तत्वांचेही उल्लंघन झाले होते.

Related Stories

No stories found.