मोरजी, हरमल किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी

वार्ताहर
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

मास्क न वापरता पर्यटकांचा मुक्तसंचार, बेशिस्तपणावर निर्बंध हवे

मोरजी: कोरोना महामारीचे संकट जगावर अजूनही आहे. त्यावर औषध अजून सापडले नाही. काही नियम घालून टाळेबंदी उठवलेली आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क वापरणे, सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, हे नियम असताना पेडणे तालुक्यातील किनारी भागात या नियमांचा विदेशी पर्यटक आणि स्थानिकही कसा फज्ज्या उडत आहे. अशा प्रकारचे चित्र मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी किनाऱ्यावर दिसते. अशा बेशिस्तपणावर निर्बंध घालायला हवे, अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत  आहे.

आंतरराज्य प्रवास वाहतूक आणि सर्व सीमा खुल्या झाल्यानंतर देश पातळीवरून राज्यात पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. आता हळूहळू किनारे गजबजू लागले आहेत. बावीस मार्च  रोजी किनारी पर्यटकासाठी मोकळे नव्हते. गर्दी करण्यास मनाई होती. तरीही काही जण गर्दी करताना दिसत होते. आता तर पर्यटकांनी किनारी भागात मोकळा श्वास घेण्यासाठी गर्दीचे चित्र दिसत आहे. त्यात स्थानिक आणि विदेशी पर्यटकांचा जास्त भरणा आहे.

एका बाजूने पर्यटकांना गोव्यातील किनारे सुरक्षित वाटत आहे. मात्र राज्यात आणि पर्यायाने पेडणे तालुक्यातसुद्धा कोरोना बाधितांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र दिसते. आंतरराज्य वाहतूक सेवा सुरू झाल्यामुळे कोण कुठून कोरोना राज्यात किनारी भागात घेऊन येईल,  हे सांगता येत नाही.

कलकत्ता येथील एक व्यावसायिक नितीशकुमार बर्मन म्हणाले, गोवा सुरक्षित वाटत होता. परंतु येतील गर्दी पाहता येथेही सुरक्षितता नाही. आंतरराज्य प्रवासी सेवा सुरू झाल्याने कोरोनाची अधिक भीती अधिक वाढली आहे.

जेवण सुरक्षित आहे का?
सरकारने सर्व भागातील हॉटेल, धाबे कमी कर्मचारी घेऊन कार्यरत करण्याची परवानगी दिलेली आहे. काही ठिकाणी खाण्या-जेवणासाठी हॉटेल, रेस्टारंट चालू केली आहेत. कमी कर्मचारी घेऊन ज्या ठिकाणी जेवण बनवले जाते. तेथे स्वच्छता राखली जाते का? हॉटेल मालकांना कमी कर्मचारी घेऊन तारेवरची कसरत करतानाची जेवण बनवावे लागेल.  ते जेवण सुरक्षित असणार का?  हॉटेल व्यवसायांत कर्मचारी ७५ टक्के बाहेरचे बंगाल, ओरिसा, नेपाळ या भागातील आहेत. आता सर्व कामगार बेकार आहेत. गोव्यातही बेकार आहेत. आता हॉटेल सुरु केली, तर गोवेकाराना हॉटेलात नोकऱ्यांच्या संधी जास्त असल्याची माहिती सूरज नाईक यांनी दिली.

संबंधित बातम्या