मगरीची निघृण हत्‍या, गोव्‍यात प्राण्‍यांना मारण्‍याचे प्रकार सुरूच.

मगरीची निघृण हत्‍या, गोव्‍यात प्राण्‍यांना मारण्‍याचे प्रकार सुरूच.
मगरीची निघृण हत्‍या, गोव्‍यात प्राण्‍यांना मारण्‍याचे प्रकार सुरूच.

पणजी,
मगरीची पूजा करणाऱ्या गोव्यात, निसर्गाचा आदर करणाऱ्या गोव्यात मगरीला बांधून ठार मारल्‍याची घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्‍याकाळी हा प्रसंग कोलवाळ गावकऱ्यांच्या लक्षात आला. त्‍वरित या प्रकाराची माहिती वन्य खात्याला कळविण्‍यात आली आणि गुन्‍हा नोंद करून घेण्‍यात आला आहे. मगरीच्‍या मृतदेहाचे पोस्‍ट मार्टमही करण्‍यात आले आहे. 
हि प्रक्रिया करण्‍यासाठी आग्‍नेलो जो साव्‍हिओ नॉबे यांनी पुढाकार घेतला. दरम्‍यान अशी घटना म्हणजे दुःखदायी तर आहेच, पण लज्जास्पद सुद्धा असल्याची प्रतिक्रिया प्राणीमित्र चरण देसाई यांनी व्‍यक्‍त केली आहे. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे, मगरीला तिच्या अधिवासात मारण्यात आलेले असल्‍याचेही देसाई म्‍हणाले. 

goa goa goa 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com