Goa Agriculture: धावे फार्मवर मोठ्या प्रमाणात भाजी लागवड; वाळपई कृषी खात्याचा उपक्रम

धावे फार्मवर विविध भाज्यांची रोपे माफक दरात उपलब्ध; शेतकऱ्यांना लाभ
Goa Agriculture|
Goa Agriculture|Dainik Gomantak

Goa Agriculture: सत्तरी हा शेतीप्रधान तालुका आहे आणि आपल्या शेती व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सेंद्रीय शेतीबरोबर नैसर्गिक शेती हाच खरा व शाश्वत पर्याय आहे. सरकारच्या कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांना विविध योजना आहेत.

त्याचा पुरेपुर लाभ शेतकरी वर्ग घेताना दिसतात. त्यात काही शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करतात. मात्र वाळपई विभागीय कृषी खात्याच्या धावे (बिबे) फार्मवर चक्क कृषी खात्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करुन एक सुप्त उपक्रम केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या फार्मवर अनेक प्रकारच्या झाडांची निर्मिती, कलमे शेतकऱ्यांसाठी माफक दरात उपलब्ध असतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे बी-बियाणे अनुदानाच्या माध्यमातून दिली जातात.

Goa Agriculture|
Bicholim Market: डिचोलीचे बाजार संकुल अखेर बनले प्रकाशमय!

डिसेंबर महिन्यातच त्यांच्या शेतात भाजी तयार झाली व ती ग्राहकांसाठी रोजच्या रोज उपलब्ध करण्यात येते. सकाळच्या सत्रात तयार झालेली भाजी काढून वाळपई विभागीय कार्यलयात विक्रीसाठी ठेवली जाते. त्यानंतर रोजच्या रोज ग्राहक भाजी खरेदी करतात.

यंदाच्या सत्रात एकूण 40 हजार रुपयांची विविध प्रकारच्या भाज्यांची विक्री झाली आहे. त्याप्रमाणे भाजी तयार होऊन ती काढल्यानंतर त्या जागेवर पुन्हा बी पेरले जाते. त्यामुळे मे महिन्यापर्यंत टप्याटप्याने विविध भाज्यांची लागवड केली जात आहे.

या भाज्यांच्या मशागतीसाठी येथे असलला कर्मचारीवर्ग झटत आहे. त्यामुळे चांगली भाजी तयार होते. तसेच विभागीय कृषी खात्याचे अधिकारी विश्‍वनाथ गावस यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे भाजीची लागवड करताना ते पीक कसे चांगले मिळू शकते याकडे लक्ष देत असतात.

भाजीच्या लागवडीबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मिरची रोपे, नवलकोल, वांगी, मका आदींची रोपे उपलब्ध केली असून ती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नफा होणार आहे.

फार्ममध्ये भाजीबरोबर सुपारी, मिरची (रोप), मिरीची कलमे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कृषी खात्याच्या विविध योजना आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेऊन स्वावलंबी बनावे, असे विश्वनाथ गावस म्हणाले.

Goa Agriculture|
Goa Agriculture: नद्यांच्या काठी बहरल्या पोफळी बागायती!

विविध पालेभाज्या

धावे येथील फार्मवर विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड केली असून त्यात लाल भाजी, वाल, मुळा, मका, नवलकोल (गड्डे) तसेच अन्य भाज्यांची लागवड केली आहे. पाऊस संपल्यानंतर नोव्हेंबरच्या दरम्यान जमिनीची मशागत करणे व इतर कामांना सुरुवात होते व त्यानंतर बियाणे पेरली जातात. ही शेती पूर्णपणे सेंद्रीय असून शेणखताचा वापर करून लागवड केली आहे.

कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांसाठी माफक दरात बी-बियाणे उपलब्ध असून कृषी खात्याच्या धावे येथील फार्ममध्ये भाजीची लागवड करून ग्राहकांसाठी ताजी व नैसर्गिक पद्धतीच्या भाज्या उपलब्ध केल्या आहेत. आता दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत आहे.

बाजारात गावठी भाज्यांना मोठी मागणी आहे. अशा प्रकारे पीक घेऊन काही प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याला पौष्टिक व ताज्या भाज्या उपलब्ध करण्याचा आमचा हेतू आहे. - विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी, वाळपई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com