Cultural events In Panjim: ‘शब्द सूर भावरंग’ने केले मंत्रमुग्ध

रसिकांची उत्स्फूर्त दाद ः पणजी शिगमोत्सव समितीतर्फे आयोजन
Cultural events In Panjim
Cultural events In PanjimDainik Gomantak

Cultural events In Panjim पणजी शिगमोत्सव समितीतर्फे आझाद मैदानावर सुरू असलेल्या विविधरंगी कार्यक्रमात, शनिवारी स्वररंजन निर्मित शब्द सूर भावरंग कार्यक्रमाने रसिकांची उस्फूर्त दाद घेतली.

सोनी इंडियन आयडॉलची महाअंतिम फेरीची मानकरी भाग्यश्री टिकले (नागपूर), हिरकणी चित्रपटाला पार्श्वगायन केलेली गायिका तथा अभिनेत्री दीपाली देसाई (मुंबई ) व कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाअंतिम फेरीचा मानकरी नवाब शेख यांनी मराठीतील भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, नाट्यगीते, युगुलगीते अशी विविधरंगी, विविधढंगी गीते पेश करून रसिकांना मंत्रमुग्ध केले, रसिकांनी एका चांगल्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

प्रफुल्ल वालावलकर यांचे रसाळ निवेदन आणि नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिन्थेसायझर ), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), मालू गावकर (संवादिनी) व तारानाथ होलेगद्दे (तालवाद्य) यांची रंगतदार साथ यामुळे कार्यक्रम खुलत गेला. समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांनी कलाकारांचा सन्मान केला.

Cultural events In Panjim
Ponda STP: स्वच्छ सुंदर फोंड्यासाठी ‘एसटीपी...!’

विविधढंगी गीते...

गणनायकाय.. या रचनेने नवाब याने सुरेख वातावरण निर्मिती केली आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. पाहिले न मी तुला, हा रुसवा सोड सखे, देवाक काळजी रे, मन मंदिरा... अशी गीते त्याने मधूर आवाजात गाऊन कार्यक्रमाची गोडी वाढवली.

भाग्यश्रीने रसिल्या आवाजात हे चांदणे फुलांनी हे भावगीत, आनंद सुधा बरसे व मी पुन्हा वनांतरी ही नाट्यगीते, जाळी मंदी पिकली करवंद.. ही लावणी, कानडा राजा पंढरीचा... हा अभंग गाऊन रंगत आणली.

दीपाली यांनी खेळ मांडियेला, दिस चार झाले मन, फुलले रे क्षण, अधीर मन झाले, वारा गायी गाणे... या गीतांनी बहार आणली. चंद्र आहे साक्षीला, शुक्रतारा, आई भवानी तुझ्या कृपेने... या युगुलगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com