कुंकळ्ळी कदंब बसस्थानकाला झळाळी मिळणार

उल्हास तुयेकर: प्रवाशांसाठी हायटेक सुविधा उपलब्ध करणार, समस्या सुटतील
कुंकळ्ळी कदंब बसस्थानकाला झळाळी मिळणार
Kadamba Bus StandDainik Gomantak

कुंकळ्ळी: कदंब महामंडळाकडे ताबा असलेल्या कुंकळ्ळी बसस्थानकाला लवकरच नवी झळाळी मिळणार असून या बसस्थानकाशी निगडित सर्व समस्या टप्याटप्याने सोडवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी सर्व मूलभूत सुविधा स्थानकावर उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आश्वासन कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिले.

तुयेकर यांनी सोमवारी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांशी हितगुज केले. यावेळी माजी आमदार क्लाफास डायस, मंडळ अध्यक्ष मारुती देसाई, नगरसेवक विशाल देसाई, पोलिटा कार्नेरो व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Kadamba Bus Stand
गोमंतक मराठा समाजाचा वर्धापनदिन 8 रोजी

कुंकळळी कदंब बसस्थानकाच्या छताच्या दुरुस्तीसाठी सरकारने टेंडर जाहीर केले असून, चोवीस लाख रुपये खर्चून पहिल्या टप्प्यात छताचे खराब झालेले पत्रे बदलण्यात येणार असल्याची माहिती तुयेकर यांनी दिली. बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष स्थापन करणे तसेच मुलांना दूध पाजण्यासाठी खास कक्ष उभारण्याची योजना आहे. बस स्थानकावर जी दुकाने बंद आहेत ती भाडेपट्टीवर देण्यास लिलाव पुकारण्यात येणार असल्याचे तुयेकर यांनी सांगितले. एकाच माणसाकडे चार-चार दुकाने भाडेपट्टीवर असून जे व्यवसाय बसस्थानकावर करणे वर्ज्य आहे असे बेकायदेशीर उद्योग बसस्थानकावर चालत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी तुयेकर यांच्या नजरेस आणून दिले. काही प्रवासी बसेस रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. ज्या बसेस बसस्थानकाचा आत प्रवेश करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

या सर्व तक्रारीची योग्य ती दखल घेऊन तातडीने उपाय योजना आखण्यात येणार असल्याचे तुयेकर यांनी सांगितले. आपण संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी व पालिका मंडळ अधिकाऱ्यांसह लवकरच बसस्थानकाची पाहणी करणार असल्याचे तुयेकर यांनी सांगितले. कुंकळळी बस स्थानकाला लवकरच नवी झळाळी प्राप्त करून देण्याचे आश्वासन तुयेकर यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.