Goa Politics: कुंकळ्ळीचे नगरसेवक उद्देश नाईक देसाई यांची गोवा फॉरवर्डमधून हकालपट्टी!

पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप...
cuncolim corporator Prakhap Naik Desai's expulsion from Goa forward
cuncolim corporator Prakhap Naik Desai's expulsion from Goa forwardDainik Gomantak

गोवा: कुंकळ्ळीमधील नगरसेवक उद्देश नाईक देसाई यांची गोवा फॉरवर्डमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. दरम्यान, पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांशी हातमिळवणी केल्याचे कारण समोर आलेले आहे.

(cuncolim corporator Prakhap Naik Desai's expulsion from Goa forward)

cuncolim corporator Prakhap Naik Desai's expulsion from Goa forward
Candolim Crime: कांदोळी येथे युवतीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विद्यार्थी विभाग प्रमुख उद्देश भिकू नाईक देसाई यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून आज त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी आज हा आदेश जारी केला.

देसाई यांच्यावर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. देसाई हे कुंकळ्ळीचे नगरसेवक असून कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्यावर सहा भाजप नगरसेवकानी अविश्वास ठराव आणला आहे. त्याला देसाई यांनीही पाठिंबा दिला असून त्यांनी या अविश्वास ठरावावर सही केली आहे.

यांनी केला भाजप प्रवेश

भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत दामोदर शिरोडकर, दामोदर परब, दीपाली सावळ, सिताराम गडेकर, सगुण नाईक, लता पेडणेकर, सेंड्रा फर्नांडिस या काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांसह राजू नाईक या गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याने आता या नगरसेवकांना रीतसर भाजपात प्रवेश देण्यात आला आहे.

cuncolim corporator Prakhap Naik Desai's expulsion from Goa forward
Fraud in Goa : निम्म्या किमतीत डिझेलचे आमिष दाखवत एक लाखांचा चुना

गोवा फॉरवर्ड पार्टीला खिंडार; 7 नगरसेवक भाजपमध्ये दाखल

नगरपालिका कायदा दुरुस्तीनंतर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांना रीतसर भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने मडगाव नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. यावर आता विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे.

निराश आणि अस्वस्थ झालेल्या दिगंबर कामत आणि भाजपने हे पद आपल्याकडे यावे यासाठी आटापिटा सुरू केला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने न घेता हात वर करून घ्यावी अशी कायदा दुरुस्ती शुक्रवारी 7 ऑक्टोबरला केल्यानंतर आता काँग्रेसचे 6 आणि गोवा फॉरवर्डच्या एका नगरसेवकाला रीतसर भाजपात प्रवेश देऊन आपले संख्याबळ 16 केले आहे. त्यामुळे मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी, 12 ऑक्टोबरला नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com