Goa News: कुडचडे नगरपालिकेची 10 दुकाने, 2 थिएटर्स भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

कुडचडे नगरपालिका मंडळाच्या बैठकीत तासाभराच्या सखोल चर्चेनंतर नव्या पालिका इमारतीतील दहा दुकाने आणि दोन थिएटर्स भाड्याने देण्याला मंजुरी देण्यात आली.
Curchorem Cacora Municipal Council
Curchorem Cacora Municipal CouncilDainik Gomantak

Curchorem Cacora Municipal Council: कुडचडे नगरपालिका मंडळाच्या बैठकीत तासाभराच्या सखोल चर्चेनंतर नव्या पालिका इमारतीतील दहा दुकाने आणि दोन थिएटर्स भाड्याने देण्याला मंजुरी देण्यात आली.

याशिवाय कचरा विलगीकरण करण्याची सवय व्हावी, यासाठी पालिकेने आता ओला कचरा आणि सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगराध्यक्ष डॉ. जस्मिन ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत विविध प्रस्तावांवर सखोल चर्चा झाली. नगरसेवक बाळकृष्ण होडारकर, अपर्णा प्रभूदेसाई, सुशांत नाईक, विश्वास सावंत, प्रदीप नाईक यांनी विविध सूचना केल्या.

बाळकृष्ण होडारकर यांनी आपल्याला बैठकीची विषयपत्रिका का देण्यात आली नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर मागील बैठकीच्या अहवालावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. नव्या पालिका प्रशासकीय इमारतीमधील एकूण दहा दुकाने व दोन थिएटर्स करार पद्धतीने देण्यासाठी बोली मागविली होती.

Curchorem Cacora Municipal Council
Fire Safety: गोव्यात आगीच्या घटनांमध्ये अनेकपटींनी वाढ कारण...

एका बोलीधारकाने इमारतीची साफसफाई, सुरक्षा रक्षकासहित थिएटर्स आणी दहा दुकाने चालविण्यास घेऊन पालिकेला दर महिना दीड लाख रुपये देण्याचे मान्य केल्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. त्यातील त्रुटी दूर करून अखेर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

पालिका क्षेत्रातील भटक्या गुरांची समस्या सोडवण्यासाठी गोमंतक गोसेवक महासंघाशी करार करण्यात येणार असून पालिका क्षेत्रात आढळणाऱ्या गुरांची गोशाळेत रवानगी करण्यात येणार आहे. जो गुरांवर हक्क सांगेल, त्याने ती गुरे रस्त्यावर येणार नसल्याची हमी देऊन घेऊन जावीत, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या बैठकीत मुख्याधिकारी मनोहर कारेकर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या बैठकीला मंत्री नीलेश काब्राल, पालिका अधिकारी मनोहर कारेकरसहित सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Curchorem Cacora Municipal Council
Fire Safety: गोव्यात आगीच्या घटनांमध्ये अनेकपटींनी वाढ कारण...

घरपट्टी, परवाना आता ऑनलाईन !

पालिका मंडळाच्या बैठकीत कुडचडे पालिकेचा कारभार आता ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले असून घरपट्टी, व्यापार परवाना, कचरा शुल्कसारखे व्यवहार यापुढे ऑनलाईन करण्यात येणार असून पालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

कुडचडे पालिकेच्या जुन्या इमारतीमधील पालिका कार्यालय व त्यावरील मजला आता खाली असल्याने तिथे ईएसआयने आपले आस्थापन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com