गोव्यात 21 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ

curfew 3.jpg
curfew 3.jpg

राज्यात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी 21जून पर्यंत संचारबंदीमध्ये (Curfew) वाढ केली आहे. सोशल मिडियावरील(social media) ट्विटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. पंचायत (Panchayat) आणि नगरपालिका (Municipality) स्थित क्षेत्रामधील दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी तीन वाजेपर्यंत चालु राहणार आहेत. तसेच लग्नविधीसाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली. यासंबंधीची विस्तृत माहिती संबंधित जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडून देण्यात येईल. त्याचबरोबर 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 

दिवसभरात कोरोनाचे नवे 472 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,62,048 एवढी झाली आहे. 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना रुग्णांची मृत्यूंची संख्या  2914 एवढी झाली आहे. (Curfew extended till June 21 in Goa)

याआगोदर मुख्यमंत्री सावंत यांनी 14 जून रोजी संचारबंदीमध्ये वाढ केली होती. तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी निर्धारिता वेळेसाठी अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालु राहणार आहे.

संचारबंदीच्या काळात बंद असलेल्या गोष्टी आता 21 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकाने सकाळी सात ते दुपारी एक या वेळेऐवजी सकाळी 7 ते दुपारी 3 यावेळेपर्यंत उघडी राहणार आहेत. सरकारने संचारबंदीत वाढ करावी. पावसाळ्यात कोविडचे रुग्ण वाढण्याचा धोका पत्करू नये असा सल्ला अनेकजण देत होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com