गोव्यातील संचारबंदीत पुन्हा वाढ

गोव्यातील संचारबंदीत पुन्हा वाढ
curfew 1.jpg

पणजी :  गोवा सरकारने (Government Goa) अखेर कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सध्या लागू असलेल्या राज्यव्यापी संचारबंदीत (Curfew) आणखीन सात दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 14 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचा अंमल असेल. यापूर्वी आठवडाभराची वाढ करण्यात आली होती. गेले काही दिवस कोविडचे रुग्ण(Covid patient) सापडण्याचे प्रमाण घटले आहे आणि कोविडने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आटोक्यात येत गेली आहे. यामुळे सरकार संचारबंदीत वाढ करताना काही गोष्टी सुरु करण्यास मुभा देईल असे वाटत होते.

त्यानुसार पावसाळापूर्व कामे करण्यासाठी लागणारे साहित्य, घर व इमारत दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य विक्री करणारी दुकाने तसेत लेखनसामग्री विक्री करणाऱ्या दुकाने उघडण्यास सरकारने मुभा देण्याचे ठरवले आहे. हा बदल 7 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून लागू होणार आहे. त्याविषयीचे आदेश उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी केले जाणार आहेत.

संचारबंदीच्या काळात बंद असलेल्या गोष्टी आता 14 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकाने सकाळी सात ते दुपारी एक या वेळेऐवजी सकाळी 7 ते दुपारी 3 यावेळेपर्यंत उघडी राहणार आहेत. सरकारने संचारबंदीत वाढ करावी. पावसाळ्यात कोविडचे रुग्ण वाढण्याचा धोका पत्करू नये असा सल्ला अनेकजण देत होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com