Goa Election 2022: मांद्रेचे मतदार अजूनही संभ्रमात!

कॉंग्रेसला जागा मिळणार कि गोवा फॉरवर्डला याबाबत मांद्रेमध्ये उत्सुकता
Goa Election 2022: मांद्रेचे मतदार अजूनही संभ्रमात!
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak

मोरजी: मांद्रे मतदार संघातील कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीचे उमेदवार कोण असणार, कॉंग्रेसला जागा मिळणार कि गोवा फॉरवर्डला याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहेत. कॉंग्रेस तर्फे सचिन परब, रमाकांत खलप व जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर उमेदवारीसाठी तर गोवा फॉरवर्ड तर्फे एकमेव दीपक कलंगुटकर इच्छुक आहेत. कॉंग्रेसतर्फे एका पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी कुणाला द्यावी याचा पेच कॉंग्रेसवर आहे.(Curiosity in Mandrem about who will get place)

Goa Assembly Election 2022
Goa Mining: खाण प्रश्न सोडवण्यात जातीने लक्ष घालणार: प्रवीण झांट्ये

मांद्रेची (Mandrem) गोवा फॉरवर्डची उमेदवारी मागच्या वर्षापासून नेते विजय सरदेसाई यांनी दीपक कलंगुटकर यांना जाहीर केली होती. त्यानंतर कॉंग्रेस (Congress) व गोवा फॉरवर्ड यांच्यात युती झाल्यामुळे ही जागा कुणाला यावर बरीच चर्चा झाली. युती करताना सरदेसाई यांनी मान्द्रेची जागा हि गोवा फॉरवर्डला सोडावी लागेल यावर युती झाली. आणि त्या नजरेतून मागच्या आठवड्यात गोवा फॉरवर्ड नेते दीपक कलंगुटकर यांनी आपल्या प्रचाराचे कार्यालय पार्से येथे सुरु केले, गोवा फॉरवर्डला (Goa Forward) जर ही जागा दिली तर कॉंग्रेस पक्षाच्या अस्तित्वाला धोका संभवू शकतो. आणि गोवा फॉरवर्डला हि जागा मिळाली तर कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार युतीसाठी काम करतील कि नाही, हे उमेदवारी जाहीर झाल्यावर कळणार आहे.

मतदार संभ्रमात

मांद्रे मतदार संघात अजून भाजपा, कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड तसेच आम आदमी पक्षाने अधिकृत उमेदवारी कुणालाच जाहीर केलेली नाही. मात्र मगोची उमेदवारी जीत आरोलकर यांनाच मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com