सध्या मी 'रिफ्लेक्टिव्ह पॉज' मध्ये आहे : विजय सरदेसाई

मी सरकारच्या विरोधातच : पण तरीही वस्तुस्थितीचा आढावा घेतो
Vijay Sardesai Latest News
Vijay Sardesai Latest NewsDainik Gomantak

मडगाव : राजकारणात प्रत्येक वेळी फॉरवर्ड फॉरवर्ड करून चालत नाही. काही वेळा येथे पॉज घ्यावी लागते. सध्या मी अशा 'रिफ्लेक्टिव्ह पॉज'मध्ये आहे अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी व्यक्त केली.

Vijay Sardesai Latest News
Goa Corona Update : गेल्या चोवीस तासात 3 नवे बाधित; 19 सक्रिय रुग्ण

एरव्ही सावंत (Pramod Sawant) सरकारवर तुटून पडणारे सरदेसाई सध्या शांत आहेत. मध्यंतरी ते सरकारात जाणार अशी वावडीही उठली होती. या पार्श्वभूमीवर आज त्यांना पत्रकारांनी त्यांच्या या शांतते बद्दल विचारले असता ते म्हणाले, फक्त विरोधासाठी विरोध करणे हे केव्हाही योग्य नसते. सध्या गोव्यातील राजकारणाने जे वळण घेतले आहे, ते पाहता सगळेच बुचकळ्यात पडले आहेत. अशा परिस्थितीत घाईगडबडीत निर्णय घेणे कधीही योग्य नसते. मीही सध्याच्या राजकीय परिस्थितीचे आकलन करत आहे.

तुम्ही विरोधी गटाबरोबर आहात की सत्ताधारी ? असा प्रश्न त्यांना विचारला असता, राजकारणात एक तर सत्ताधारी गटात असतात किंवा विरोधी गटात. मी सत्ताधारी गटात नाही याचाच अर्थ मी विरोधी गटात आहे असा होतो. सभापतीच्या निवडणुकीत मी आलेक्स सिक्वेरा यांच्यासाठी मतदान केले आहे. भाजप सरकारने कधी माझा पाठिंबा मागितलेला नाही आणि मीही तो दिला आहे असे कधी सांगितलेले नाही असे ते म्हणाले.

सध्या तुम्ही तपस्या करता का? असे विचारले असता सरदेसाई म्हणाले, जे कोण म्हातारे झाले आहेत ते तपस्या करतात, मी काही एव्हढा म्हातारा झालेलो नाही. मात्र मी स्थितीचे अवलोकन जरूर करत आहे.

काँग्रेसवर (Congress) टीका करताना सरदेसाई म्हणाले, आज काँग्रेस एकत्रित विरोधकांच्या भूमिकेची गरज व्यक्त करीत आहे. याचे कारण म्हणजे आज त्यांना त्याची गरज आहे. मात्र आम्ही जेव्हा ही भाषा बोलत होतो त्यावेळी ते 40 सही मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या मूडमध्ये होते असा टोमणा त्यांनी हाणला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com