Cyber crime
Cyber crime

गोव्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासाला ‘ब्रेक’, उपमुख्यमंत्र्यांच्या तक्रारीचे तपासकाम रखडले 

पणजी: गेल्या अडीच वर्षात सीआयडी(CID) सायबर क्राईम(cyber crime) कक्षात 39 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 10 प्रकरणांमध्ये आरोपपत्रे दाखल झाली आहेत तर 12 प्रकरणे पुराव्याअभावी पोलिसांनी बंद केली आहेत. 17 प्रकरणांचा तपास सुरू आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या तक्रारीचा तपास फोरेन्सिक अहवालामुळे अडल्याचे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Cyber crime investigation stalled in Goa)

या कक्षाकडे 2019 मध्ये 10 प्रकरणे नोंद झाली होती, त्यापैकी 9 प्रकरणांचा तपास पूर्ण होऊन 2 प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. 7 प्रकरणांचा तपास पुराव्याअभावी बंद तर एका प्रकरणाचा तपास सुरू आहे. 2020 मध्ये 24 प्रकरणे नोंद झाली होती त्यापैकी 13 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून 11 प्रकरणांचा तपास सुरू आहे.  अनेकदा तक्रारीत नमूद केलेली माहिती ही बनावट असते. काही संशयित हे देशातच नव्हे, तर देशाबाहेरूनही असे प्रकार करत असतात. त्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागत नाही. सध्या संशयितही गुन हायटेक झाले आहेत. नवी आयटी टेक्निक वापरून ते असे प्रकार करतात. त्यामुळे त्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही गरज असते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सायबर गुन्हांच्या तपासात अडथळे
सायबर कक्षाकडे आलेल्या तक्रारी या बहुतेक ईमेलवरून रोख रक्कमेची फसवणूक झालेली, फेसबूकवरून अश्‍लिल कॉमेंट्स तसेच अश्‍लिल छायाचित्रे पाठवणे किंवा तरुणीचा चेहरा लावून अश्‍लिल छायाचित्रे व्हटस्अप ग्रुपवरून सर्क्युलेट करणे यासंदर्भातच्या असतात. माहिती तंत्रज्ञान कायद्यासह इतर भादंसंच्या कलमाखाली या तक्रारी प्राथमिक चौकशीनंतर नोंद करण्यात येतात. फेसबूक तसेच व्हटस्अप या सोशल मीडियाचे स्रोत हे देशाबाहेर असल्याने त्यांच्याकडून माहिती मिळण्यास बराच काळ जातो. त्यामुळे तपासकामातही अडथळा येतो. अनेकदा या फेसबूक व व्हॉटस्अप कंपन्यांकडून तपासकामात सहकार्य केले जात नाही त्यामुळे नाईलाजाने तपासकाम बंद करण्याची वेळ येते, असे मत या कक्षाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

उपमुख्यमंत्र्यांच्या तक्रारीचे तपासकाम रखडले 
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या मोबाईलवरून सोशल मीडियावर अश्‍लिल व्हिडिओ एका ग्रुपवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्यांनी सायबर क्राईम कक्षाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासणीकरता तो फोरेन्सिक लेबोरेटरीकडे पाठविला आहे. तसेच व्हॉटस्अप याचा कंपनीचा स्रोत देशाबाहेर असल्याने त्यांनाही ईमेलद्वारे माहिती देण्यास सांगण्यात आले आहे; मात्र अजूनही अहवाल मिळालेला नसल्याने तपास रखडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com