डिचोलीत चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर 

decholi 1.jpg
decholi 1.jpg

डिचोली: मागील महिन्यात तडाखा दिलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळात (Toukte  cyclone) डिचोली(Dicholi) तालुक्यातील दीडशेहून अधिक शेतकरी-बागायतदारांना नुकसानीची झळ बसली असून, शेती-बागायतींची मिळून जवळपास 35 लाखांची हानी झाली आहे. नुकसानीची झळ बसलेल्या जवळपास 140 शेतकरी-बागायतदारांच्या(Farmer) नुकसानीचे अहवाल विभागीय कृषी कार्यालयाकडून तयार करून, ते जिल्हा प्रशासनाकडे (district administration) पाठवण्यात आले आहेत. तर अन्य काही शेतकरी-बागायतदारांच्या नुकसानीचे अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे. अशी माहिती विभागीय कृषी कार्यालयातून(Agriculture Office) उपलब्ध झाली आहे. (Cyclone hits 150 farmers in Bicholim Loss of 35 lakh report submitted to district administration)

मागील मे महिन्याच्या 16 तारखेला तडाखा दिलेल्या चक्रीवादळात तालुक्यातील साळ, मेणकूरे, अडवलपाल, मुळगाव, नार्वे, सुर्ल, मये आदी भागात कुळागरे-बागायती आदी कृषी पिकाची नासधूस झाली होती. डिचोली विभागीय कृषी अधिकारी निलिमा गावस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कृषी अधिकारी दीपक गडेकर आणि  शेतकी खात्याच्या अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून  शेती-बागायतींची पाहणी करून  नुकसानीचे  अहवाल तयार  करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. मोजकेच शेतकरी-बागायतदार वगळता बहुतेकांच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याने सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची आशा आहे. 

दीडशे शेतकऱ्यांना फटका 
'तौक्ते' चक्रीवादळात डिचोली तालुक्यात जवळपास 150 शेतकरी-बागायतदारांना नुकसानीची झळ बसली आहे. 140 जणांच्या नुकसानीचे अहवाल तयार करून ते मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. सात ते आठजणांच्या नुकसानीचे अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे. अजूनही काहीजणांनी कृषी कार्यालयात संपर्क साधून अर्ज केलेले आहेत. पाहणी केल्यानंतरच पुढील सोपस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती विभागीय कृषी अधिकारी निलिमा गावस यांनी दिली आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com