Cyclone Tauktae Impact: ‘तौक्ते’ वादळामुळे गोव्यात 40 कोटींचे नुकसान 

Cyclone caused a loss of Rs 40 crore in Goa
Cyclone caused a loss of Rs 40 crore in Goa

पणजी, म्हापसा: ‘तौक्ते’ (tauktae) चक्रीवादळाच्या (Cyclone) तडाख्यामुळे (impact) राज्याचे सुमारे 40 कोटींचे नुकसान झाले. त्यामध्ये घरांची (Home) झालेली पडझड, वीज उपकरणांचे नुकसान, बागायती व शेतीचे नुकसान यांचा समावेश आहे. राज्यात सुमारे 95 टक्के वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे व उर्वरित भागात तो सुरळीत होण्यास किमान दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. खात्याच्या तांत्रिक मनुष्यबळाअभावी या कामास विलंब होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (Cyclone tauktae caused a loss of Rs 40 crore in Goa)

म्हापसा येथे आज मुख्यमंत्री (Chief MInister) डॉ. सावंत (Pramod Sawant) यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली तसेच काही ठिकाणी जाऊन घरांच्या झालेल्या पडझडीची पाहणी केली. उपजिल्हाधिकारी तसेच वीज अभियंता यांची बैठक घेतल्यानंतर बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, वीज खात्याची सर्वाधिक हानी झाली आहे. मोडून पडलेले खांब व तुटलेल्या विजेच्या वाहिन्यांचे काम करण्यासाठी गोव्यात असलेले मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे राज्याबाहेरून ते आणण्यात येणार आहे. 

बार्देश तालुक्यात सुमारे 135 घरांवर झाडे पडून किंवा वादळामुळे पत्रे किंवा कौले उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून त्यांना मदत करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी व मामलेदारांना देण्यात आले आहेत. बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना या निधीची कमतरता भासत असल्यास तो मागवून घेण्यास सांगितले आहे. अजूनही कोणाचा अर्ज आल्यास तो स्वीकारून मदत देण्याच्या सूचना केल्याचे मुख्‍यमंत्री  सावंत यांनी सांगितले. 

चक्रीवादळामुळे झाडांची झालेली पडझड व तुटून पडलेल्या वीजवाहिन्या यामुळे बंद झालेली रस्ता वाहतूक खुली करण्यासाठी वीज, पोलिस, अग्निशमन दल तसेच पालिका व पंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधी जनजीवन पूर्वपदावर येण्यास रस्त्यावर उतरून काम करत असताना जनतेने त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. वीजपुरवठ्याअभावी ज्या ठिकाणी पाणीटंचाई झाली, तेथे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या आहेत, असे सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com