Cyclone Tauktae: सावधान! अखेर चक्रीवादळ गोव्यात धडकले...

Cyclone Tauktae hits coastal parts of Goa
Cyclone Tauktae hits coastal parts of Goa

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात ((Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौकते (Tauktae) वादळ निर्माण होऊन ते किनारपट्टीवर धडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर आज तौकते हे चक्रीवादळ गोव्याच्या (Goa)  किनारपट्टी भागावर धडकले असून, आज सकाळ पासूनच या वादळाचे परिणाम दिसायला सुरुवात  झाली आहे.(Cyclone Tauktae hits coastal parts of Goa)

येत्या काही तासात चक्रीवादळ कोकण (Konkan) किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

तौकते या वादळाचा केरळ, लक्षद्वीप या राज्यांना फटका बसण्याची शक्यता असून गोवा, कोकण तसेच मुंबईच्या किनारी  भागांवर देखील काही स्वरूपात परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात  आली होती. याकाळात जोरदार वारा आणि पाऊस होणार असल्याची  हवामान आहे. तुम्ही या वादळाचे लाईव्ह लोकेशन तुमच्या फोनद्वारे सुद्धा पाहू शकता. खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन तुम्ही तुमच्या फोनमध्ये पाहू शकता. 

गोव्यापासुन जवळ असलेल्या रत्नागिरी मध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला काल सुरवात झाली.शनिवारी दक्षिण रत्नागिरी परिसराला पावसाने झोडपलं. या वादळामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

या वादळामुळे काही ठिकाणी लसीकरण देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com