Cyclone Tauktae: झाडं पडले, छतं उडाले, गोव्यात तौकतेचे थैमान...

Cyclone Tauktae: झाडं पडले, छतं उडाले, गोव्यात तौकतेचे थैमान...
Cyclone Tauktae lashes Goa: Cyclonic storm hits coastal state

पणजी: अखेर आज तौकते हे चक्रीवादळ गोव्याच्या (Goa)  किनारपट्टी भागावर धडकले असून, आज सकाळ पासूनच या वादळाचे परिणाम दिसायला सुरुवात  झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात ((Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौकते (Tauktae) वादळ निर्माण होऊन ते किनारपट्टीवर धडकण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. (Cyclone Tauktae hits coastal parts of Goa)

CYCLONE TAUKTAE: तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर
राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांसह गावातील रस्त्यांवर वृक्ष कोसळले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो वीज खांब कोसळले आहेत तसेच ट्रान्स्फॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वत्र वीज खंडित आहे. घरांवर झाडे कोसळून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. ताळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे दर्शनी ग्लास  जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. दूरसंचार यंत्रणा कोलमडली आहे. 

रत्नागिरीला आणि सिंधुदूर्गला तडाखा 

गोव्यापासून जवळ असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसासह वाऱ्याचा वेग वाढला असुन  जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून पावसासह ढगांचा गडगडाट देखील होता. तोक्ते चक्रीवादळाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात संचार बंदी लागू केली असून कोरोना लसीकरण देखील बंद ठेवण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सकाळी नऊच्या सुमारास धडकलेल्या वादळामुळे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे समजते आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करून सिंधुदुग जिल्हा प्रशासनाने काल रात्रीपासूनच तयारीला सुरुवात केली होती. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com