Goa News: विचार महोत्सवाची नवी तारीख जाहीर करणे गरजेचेच!

फ्रान्सिस सार्दिन : त्यामुळे अनेक गैरसमज टाळणे शक्य
D. D. Congress South Goa MP Francis Sardin say should have announced the new date of the Kosambi lecture series
D. D. Congress South Goa MP Francis Sardin say should have announced the new date of the Kosambi lecture seriesDainik Gomantak

सासष्टी: दरवर्षी होणारी डी. डी. कोसंबी व्याख्यानमाला राज्य सरकारने पुढे ढकलली, यात गैर काहीच नाही. पण त्याचबरोबर राज्य सरकारने व्याख्यानमालेची नवी तारीख जाहीर करायला हवी होती. त्यामुळे गैरसमज टाळता आले असते, असे कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले.

(D. D. Congress South Goa MP Francis Sardin say should have announced the new date of the Kosambi lecture series)

D. D. Congress South Goa MP Francis Sardin say should have announced the new date of the Kosambi lecture series
Goa News: CBI अधीक्षक आशेश कुमार यांना लाचविषयक ‘ते’ वक्तव्य भोवले; थेट उचलबांगडी

सार्दिन यांनी आज पत्रकार परिषदेत विविध विषयांवरून सरकारवर टीका केली. रेती उत्खननासंदर्भात सार्दिन म्हणाले की, राज्यात बेकायदा रेती उत्खनन सुरूच आहे. रेतीची किंमत गगनाला भिडली आहे. सरकारने ताबडतोब रेती उत्खननासाठी जागा निश्र्चित करणे गरजेचे आहे. गोव्यात चिरे, खडी यांचा तुटवडा आहे. घरे व रस्ते बांधणीसाठी या वस्तू गरजेच्या आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील मोकाट गुरे, भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यामुळे अनेक अपघात होतात. वाहतूकही खोळंबते. गोव्यात पर्यटन व्यवसाय वाढवायचा असेल तर या भटक्या जनावरांना आवरले पाहिजे व रस्ते सुरक्षित केले पाहिजेत, असे सार्दिन यांनी सांगितले.

D. D. Congress South Goa MP Francis Sardin say should have announced the new date of the Kosambi lecture series
Goa Politics: भाजपने नोकऱ्या दिल्या नाहीत, तर अक्षरश: विकल्या युरी आलेमाव यांचे गंभीर आरोप

‘मोपा’ला जॅक सिक्वेरा यांचे नाव द्यावे

मोपा विमानतळाला केवळ जॅक सिक्वेरा यांचेच नाव द्यावे. सिक्वेरा यांचे ओपिनियन पोल आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान लाभले होते. त्यांच्यामुळेच गोवा स्वतंत्र राहिला. गोव्याचे वेगळेपण अबाधित राहिले, असे सार्दिन यावेळी म्हणाले.

जेटी धोरणाविषयी स्पष्टीकरण हवे!

प्रत्येक ग्रामसभेत जेटी धोरणाला विरोध होत आहे. हे जेटी धोरण नेमके कशासाठी, याचेही स्पष्टीकरण सरकारने देणे क्रमप्राप्त ठरते. रेल्वे दुपदरीकरण, जेटी धोरणविरोधी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात आयआयटीऐवजी आयटीआय सुरू करावी. त्याचा स्थानिक विद्यार्थ्यांना जास्त लाभ होईल. आमदारांनी हा विषय विधानसभेत मांडावा, असे त्यांनी सुचविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com