Goa: दाबोळी विमानतळ अबाधित राहणार! खासदार फ्रान्सिस सार्दिनांचा खुलासा

Francisco Sardinha: मोपा विमानतळ सुरु झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होईल, अशा अफवांवर विश्‍वास ठेऊ नका.
Daboilm Airport
Daboilm AirportDainik Gomantak

Goa Airport: मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळी विमानतळ बंद होईल, अशी अफवा पसरवली जात आहेत. त्यात काहीच अर्थ नाही, अफवांवर विश्‍वास ठेवू नका. दाबोळी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे दाबोळी विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन (MP Francisco Sardinha) यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. दाबोळी विमानतळ बंद होणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

सल्लागार समितीची पहिली बैठक गुरुवारी दाबोळी विमानतळाच्या परिषद कक्षात घेण्यात आली. या बैठकीला दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक एस. सी. टी. धनंजय राव, सदस्य व उद्योजक नारायण बांदेकर, अतुल जाधव, शरद चोपडेकर तसेच संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

Daboilm Airport
Mopa Airport बांधून दिलेले घर कुटुंबीयांच्या नावे नाही

बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सार्दिन यांनी दाबोळी विमानतळ सुरूच राहणार आहे. राज्यात मोपा व दाबोळी विमानतळाची गरज आहे. मोठी विमाने दाबोळी विमानतळावर उतरू शकत नाहीत. ती मोपावर उतरतील.

दाबोळी विमानतळावरील पार्किंगसंबंधी चर्चा करण्यात आली आहे. ही समस्या येत्या महिन्याभरात दूर करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले आहे, असे सार्दिन यांनी सांगितले. चोपडेकर यांनीही दाबेळी विमानतळासंबंधी काही मुद्दे उपस्थित केले तसेच दाबोळी विमानतळासमोरील महामार्गावरील पथदीप पेटत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे नजरेस आणून दिले.

Daboilm Airport
Mopa Airport बांधून दिलेले घर कुटुंबीयांच्या नावे नाही

दोन्ही विमानतळ आवश्‍यक-

दाबोळी विमानतळावरील नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण का होत नाही, यासंबंधी त्यांनी विचारणा केली. विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेस्टॉरंट असणे गरजेचे आहे जेणेकरून महसूल वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले. दाबोळी व मोपा या दोन्ही विमानतळांची गरज आहे, असेही उद्योजक नाना बांदेकर म्हणाले.

प्रवाशांना सुविधा द्या-

अतुल जाधव म्हणाले, प्रवासी दोन तास अगोदर विमानतळावर येतात. परंतु तेथे कोणतीही मनोरंजनाची साधने नाहीत. वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होतात, त्यासंबंधी तोडगा काढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सेंटर केसिंग कॉर्पोरेशन (Corporation) आपली सुविधा बंद करणार आहे. त्यामुळे एअर कार्गो कसा पाठवावा, हा प्रश्न उपस्थित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com