गोव्यातील साळ नदीच्या पात्रात दहीहंडी उत्सव जल्लोशात

नदीच्या पाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा गोव्यातील हा पहिलाच प्रयोग
गोव्यातील साळ नदीच्या पात्रात दहीहंडी उत्सव जल्लोशात
दहीहंडीDainik Gomantak

देशात दहीहंडीमुळे सर्वत्र चैतन्यदायी आणि उत्सवाचे वातावरण आहे. कोराना महामारीमुळे सार्वजनिक उत्सवावर बंदी आहे. मात्र गोव्यातील बापसोरा-बैतूल येथील युवकांनी आपला पारंपारिक दहीहंडी उत्सव आपसोरा येथे साळ नदीत साजरा करून सर्वाचं लक्ष्यवेधून घेतलं आहे.

नदीच्या पाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा गोव्यातील हा पहिलाच प्रकार असावा, जो या युवकांनी केला आहे. बापसोरा-बैतूल येथील बाल तरुण क्षत्रिय मराठा समाजाने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करून उत्साहात भर घातली आहे. साळ नदीतील खळाळत आणि वाहत्या पाण्यात 'गोविंदा रे गोपाळा. म्हणत दहिहांडी फोडण्यात आली. गोविंदा आला रे आला.. नादही नदित घुमला. श्रीकृष्ण आणि नदीच्या पाण्याचे एक जिव्हाळ्याचे सख्य आहे. कंसाच्या बंदीखान्यात जन्मल्येल्या ताव्ह्या कान्हाला वडील वासुदेवाने टोपलीत बसवून महापूरातून वाट काढली होती. म्हणून श्री कृष्णाचं नदीशी जन्मापासून नातं आहे.

दहीहंडी
गोव्याची फेणी ‘गल्ला’ जमवण्‍यात कमी!

नदीच्या पाण्यात घुमला 'गोविंदा रे गोपाळा'चा नाद

या युवकांनी नदीत दहीहंडी साजरी करून क्रिष्ण जन्माची पुन्हा आठवण करून दिली. साळ नदीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यामागची संकल्पना सांगताना बापसोराबैतूल येथील बाल तरुण वात्रिय मराठा मंदळाची होती. गेल्या कित्येक वर्षापासून बापसोरा- बेतूल येथील मांडावर गोकुळाष्टमी दहीहंडी वर्षभर येणारे उत्सव स्थानिक पातळीवर ते साजरे करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील स्थानिक चर्चसंस्थेने या उत्सवाच्या ठिकाणी कुंपण घालून या जागेवर सार्वजनिक उत्सवासाठी बंदी घातली. आणि मग जागाच उपलब्ध नसल्याने उत्सव साजरे करणे कठीण झाले . गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे साध्या पद्दतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र यावर्षी साळ नदीच्या पाण्यात पारंपारिक दहीहंडी साजरी करण्याची संकल्पना युवकांना सुचली. आणि ती कल्पना सत्यात उतरली.

दहीहंडी
OLD GOAN HOUSES: गोवेकरांनी जपला गोव्यातील जुन्या घरांचा वारसा

गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा साळ नदीत करण्यात आली. आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. साळ नदीत दहीहंडी साजरी करून वेगळाच जल्लोश तयार झाला. नदीच्या पाण्यात दहीहंडी साजरी करणे सुरक्षित असून, कोरोना महामारी व इतर खबरदारी घेऊन उत्सव साजरा केल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दहीहंडी उत्सवात स्वप्निल जुवेकर, वरुण जुबेकर, योगेश कुचेकर, दोगेश कुमटेकर, निखिल वाटकर, रिशभाटकर, विपुल केरकर राशि मकर सर्वणकर वेदांत खराडे, आदित्य खराडे, सूरज केरकर, रुद्रेश तारी तेजस जुटकर विराज केवार, शैल भोसले, संतोष मेहता या युवकांनी सहभाग घेतला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com