‘गोमन्तक टीव्ही’ आता गोमंतकीयांच्या सेवेत

दामोदर मावजो : भाषेला प्रमाणिकरणाची गरज नाही!
‘गोमन्तक टीव्ही’ आता गोमंतकीयांच्या सेवेत

Gomantak TV

Dainik Gomantak 

पणजी: कोकणींच्या अनेक बोली आहेत. या बोलीमुळेच भाषा समृद्ध होत जाते. त्यात नव्या शब्दांची भर पडते. या सर्व बोलींचे महत्त्व आपण जाणले पाहिजे. ‘भाषेचे प्रमाणिकरण’ ही संज्ञा फार कर्मठपणे घेता कामा नये. जगातल्या अनेक भाषा त्यात सतत होणाऱ्या नव्या शब्दांच्या अंतर्भावामुळे श्रीमंत बनल्या आहेत. कोकणीबद्दलही तसेच होणे गरजेचे आहे, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.

<div class="paragraphs"><p>Gomantak TV</p></div>
जीनोम  सिक्वेन्सिंगचे 2 हजार नमुने प्रलंबित

दै. सकाळ समूहाच्या ‘गोमन्तक टीव्ही’चे (Gomantak TV) उद्‍घाटन मंगळवारी करण्यात आले. याप्रसंगी वृत्तवाहिनीच्या संपादकीय विभागातील सदस्यांच्या प्रश्नांना अत्यंत दिलखुलासपणे ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो (Damodar Mauzo) यांनी उत्तरे दिली. या संवादातून त्यांनी कोंकणी भाषेबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी 'गोमन्तक'चे संपादक संचालक राजू नायक, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र मेहता, व्यवस्थापक सचिन पोवार, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अनिल शेलार, शैला मावजो, सुहास घटवाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

निर्भीड अन्‌ सामाजिक बांधिलकी

‘गोमन्तक’ हे स्वतंत्र गोव्याचे जुने वर्तमान पत्र. गोमन्तक आणि सकाळ समूहाने गोव्यासाठी नवीन कोंकणी (Konkani) न्यूज चॅनल सुरू केले. या चॅनेलवर बातम्यांसोबतच गोव्याचे वेगवेगळे सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी असलेली पत्रकारिता गोमंतकीयांना देण्याचा वसा ‘गोमन्तक टीव्ही'ने घेतला आहे, असे राजू नायक यांनी सांगितले.

ज्वलंत विषय मांडणार : दिवसभरात गोव्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांची भरगच्च अशी तासाभराची चार बातमीपत्रे थेट प्रक्षेपित तसेच ‘सडेतोड नायक' व ‘आमची नदर आसा’ हे गोव्याला भेडसावणारे ज्वलंत विषय मांडणारे कार्यक्रम रोज प्रक्षेपित होतील. शिवाय गोव्यातील सांस्कृतिक व क्रीडा घडामोडी, कला, लोककला, महिला वर्ग, उद्योग जगत यांच्यावर प्रकाशझोत टाकणारे व समाजात आपला ठसा उमटवणारी व्यक्तिमत्त्वे यांच्यावरील ‘जायना अशे काय ना’ अशा विविधरंगी कार्यक्रमांची या रेलचेल असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com