Goa: 'दाजी कासकर' यांचे पेडणे येथे उपोषण 
स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी यामागणीसाठी कार्यकर्त्यासह  उपोषणाला बसलेले दाजी कासकर. (Goa)Dainik Gomantak

Goa: 'दाजी कासकर' यांचे पेडणे येथे उपोषण 

भाजपने स्थानीक उमेदवाराला उमेदवारी द्यावी, कासकर यांची मागणी (Goa)  

Goa: २०१७ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Former CM Manohar Parrikar) यांनी पेडणे मतदार संघातील जेष्ठ भाजपा कार्यकर्त्याना आश्वासन दिले होते कि आगामी निवडणुकीत स्थानिक उमेदवार देणार म्हणून, आता भाजपाने त्यांची पूर्तता करून केवळ स्थानिक उमेद्वारालाच उमेदवारी द्यावी या मागणीसाठी आज भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त्ये आणि पेडणे माजी भाजप अध्यक्ष (Former Pernem BJP president) तसेच जेष्ठ राष्ट्रीय स्वंय सेवक दाजी कासकर (senior national volunteer Daji Kaskar) यांनी  पेडणे जुन्या बस स्थानकावर बसुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त्ये दाजी कासकर यांच्या नैतृत्वाखाली माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई, गुंडू राऊळ, अनिल धुरी, सुनय चणेकर, मोपा माजी सरपंच रुपेश परब, गजानन देसाई, श्याम नाईक, गजानन गडेकर आदी कार्यकर्त्ये या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यानी " दाजी कासकर तुम आगे बढो", भाजपची उमेदवारी स्थानीकालाच द्या "अशा घोषणा देण्यात आल्या.तत्पूर्वी दाजी कासकर यांनी कार्यकर्त्यासह श्रीभगवती देवीचे दर्शन घेतले.

स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी यामागणीसाठी कार्यकर्त्यासह  उपोषणाला बसलेले दाजी कासकर. (Goa)
Goa Vaccination: लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ

श्री भगवती मंदिर येथे देवीचे आशीर्वाद घेवून धरणे आंदोलनाला सुरुवात

दाजी कासकर यांनी माहिती देताना आपण या पूर्वीच भाजपचे संघटक मंत्री सतीश धोंड व प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यानाही सांगितलेले आहे,कि २० वर्षे पेडणेवासीयांची सेवा केली त्याला त्या पूर्णविराम द्या आता आगामी निवडणुकीत स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. आता या पुढे काही बोलण्याचे गरज नाही. स्थानिक उमेदवार दिला तरच त्यांच्या विजयाची जबाबदारी आम्ही घेणार असल्याचे दाजी कासकर यांनी सांगितले.

माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ यांनी बोलताना १९९९ साली भाजपने धारगळ मतदार संघातून उमेदवारी दिली होती, तेव्हा त्याना जास्त पाठींबा मिळाला नाही. मात्र आता स्थानिक उमेदवाराला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळू शकतो. जेष्ठ भाजपाचे कार्यकर्त्ये दाजी कासकर यांनी या वयात जे आंदोलन सुरु केले त्याला आमचा पूर्ण पाठींबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांनी बोलताना कोणीही उमेदवार द्या मात्र स्थानिक उमेदवार द्या. बाहेरच्या उमेदवाराला स्वताचे मत नसते आणि तो निवडून आल्यावर आपल्याला वाट्टेल तसे वागतो, मतदारांच्या शब्दाला किंमत देत नाही. आणि आता तोच उमेदवार दिला आणि निवडून आणला तर तोम्हणणार आपल्याला आपल्याच कार्यकर्त्यांनी मते घालून निवडून आणले, जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी मते दिली नाही असे तो म्हणणार त्या पेक्षा भाजपने आपले आश्वासन पाळून स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी गजानन सावळ देसाई यांनी केली.

स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी यामागणीसाठी कार्यकर्त्यासह  उपोषणाला बसलेले दाजी कासकर. (Goa)
Tobacco productsची गोव्यातील शैक्षणिक सस्‍थांजवळ होतेय विक्री

गजानन गडेकर यांनी बोलताना दाजी कासकर यांच्या मागणीला सर्व भाजपा जेष्ठ कार्यकर्त्यांचा पाठींबा आहे. मागच्या दोन निवडणुकीत आम्ही मनोहर पर्रीकर यांच्याकडे मागणी केली होती आम्हाला स्थानिक उमेदवार द्यावा म्हणून , त्यावेळी पर्रीकारने सांगितले होते २०१७ च्या निवडणुकीनंतर स्थानिक उमेदवार देणार म्हणून , आता भाजपने त्याची पूर्तता करावी अशी मागणी केली आहे.

मोपा माजी सरपंच रुपेश परब यांनी बोलताना बाहेरचा उमेदवार निवडून येतो आणि आपल्याला हवा तसा विकास करतो, आमचा विकासाला विरोध नाही. लोकाभिमुख विकास होत नाही, त्यामुळे आमचा स्वाभिमान दुखावला जातो. वरिष्ठ नेत्यांनी आता स्थानिक उमेदवार द्या जेणेकरून त्याना आम्ही केव्हाही रात्री अपरात्री भेटू शकतो आणि समस्या मांडू शकतो, सध्याचा आमदार कुठे मतदार संघात आहे , तो मतदाराना भेटत नाही जे काही ठरावीक त्याचे चेले असतात त्यांनाच तो भेटतो. या पुढे केवळ स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी केली.

यावेळी व्यंकटेश घोडगे यांनी विचार मांडून दाजी कासकर यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com