आगामी पालिका निवडणूक लढविणार नाही: दाजी साळकर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

वास्को शहरातील प्रभागातून सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत. गेल्या खेपेस तर राज्यातील सर्व पालिकांच्या नगरसेवकांपैकी सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करून निवडून येणारे ते पहिले नगरसेवक ठरले होते.

मुरगाव: आतापर्यंत वास्को शहराचे नगरसेवकपद भूषविणाऱ्यांत सर्वाधिक यशस्वी आणि  लोकप्रिय  ठरलेले  नगरसेवक दाजी साळकर आगामी पालिका निवडणूक लढविणार नाही. आपण आगामी पालिका निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

वास्को शहर प्रभागातील गेल्या १५ वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे दाजी साळकर यांनी शहराच्या भरीव विकासासाठी तन मन धन एकवटून आपले योगदान दिलेले आहे. निःस्वार्थीपणे त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष दिले आहे, पण आता निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

वास्को शहरातील प्रभागातून सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत. गेल्या खेपेस तर राज्यातील सर्व पालिकांच्या नगरसेवकांपैकी सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करून निवडून येणारे ते पहिले नगरसेवक ठरले होते. ही किमया कायम असावी यासाठी त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे, पण नवीन कोणी तरी वास्को शहराचे प्रतिनिधित्व करावे असे मत दाजी साळकर यांचे आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या