दलित व कुंभार समाजातील बांधवांना गणेशचतुर्थी सणासाठी मदतीचा हात द्यावा

वार्ताहर
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गोवा शाखेची सरकारकडे मागणी

साळ: कोविड - १९ ही भयानक  माहामारी जागतिक पातळीवर आपले उग्र रूप दाखवित आहे. भारतात मार्च  २०२० पासूनच्या टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तसेच कुटीरोद्योगांनाही त्याची झळ  बसलेली आहे. गावातील घरगुती कामधंदे बंद झालेले आहेत. त्यामुळे राज्यातील दलित व कुंभार समाजातील नागरिकांना गणेशचतुर्थी सणानिमित्त सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (कांबळे गट) गोवा शाखेतर्फे पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

दलित समाज हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु कोविड महामारीमुळे सध्या त्यांचा रोजगार गेला आहे. 

त्याचप्रमाणे गोव्यातील कुंभार समाजाचा कामधंदा ठप्प झाला. कोरोनामुळे खेड्यातील दोन्ही समाजाचे काम बंद पडल्याने रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. या समाजातील तरुण पिढी हॉटेलच्या गाड्या चालवत होते. हॉटेले बंद असल्याने तेही सर्व बेरोजगार झाले आहेत, तरी या दोन्ही समाजाच्या नागरिकांना गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या