तेमवाडा मोरजीतील घरावर आम्रवृक्ष कोसळून नुकसान

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

तेमवाडा-मोरजी येथे आज (रविवारी) सकाळी अमित मोरजे यांच्या घरावर आम्रवृक्ष पडल्याने घराचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले.

पेडणे: तेमवाडा-मोरजी येथे आज (रविवारी) सकाळी अमित मोरजे यांच्या घरावर आम्रवृक्ष पडल्याने घराचे सात हजार रुपयांचे नुकसान झाले. 

अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान यांनी ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचविली. पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर, चालक विठ्ठल परब व दिलिप बाबरेकर, जवान यशवंत नाईक, अमोल परब, जवान विकास चौहान यांनी कामगिरी बजावली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या