फोंड्यात पावसामुळे भातपिकाचे नुकसान

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

राज्यात कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्री व सकाळी आणि संध्याकाळी पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. फोंडा तालुक्‍यातील ओहळ व नालेही पाण्याने भरून वाहताना दिसले.

 

फोंडा :  राज्यात कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्री व सकाळी आणि संध्याकाळी पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. फोंडा तालुक्‍यातील ओहळ व नालेही पाण्याने भरून वाहताना दिसले.

सुदैवाची बाब म्हणजे रस्त्यावर काही किरकोळ झाडे कोसळली तरी मोठी हानी झाली नाही. विशेष म्हणजे कापणीला आलेले भात काही ठिकाणी शेतीत आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे. 

फोंड्यात परतीच्या पावसाने लोकांची तारांबळ उडवून दिली आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने काही ठिकाणी किरकोळ झाडांची पडझड झाली, मात्र सुदैवाने कुठे हानी झाली नाही.
राज्यात सध्या भात कापणीचे दिवस आहे. कापणीला आलेले भात परतीचा पाऊस आणि वाऱ्यामुळे काही ठिकाणी शेतीत आडवे झाल्याने भातपिकाचा दाणा कुजण्याचा धोका आहे. आडवे झालेले भातपीक कापण्यासाठी पावसाची उसंतही नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. फोंडा तालुक्‍यात काही ठिकाणी पावसाळाकालीन भातपिक घेण्यात येते, मात्र यंदा मोठे नुकसान होण्याचा धोकाही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

भातपिकाबरोबरच इतर भाजीपाला तसेच फळ झाडांवरही परतीच्या पावसाचा परिणाम झाला आहे. सुपारी गळून पडत असल्याने बागायतदारांनाही मोठे नुकसान होत आहे. कच्ची सुपारी झाडावरून तुटत असल्याने बागायतदारांनाही मोठा फटका बसला असून पावसाच्या फटक्‍यामुळे नुकसान झालेल्यांना सरकारनेच मदत करण्याची आवश्‍यकता आहे. 

संबंधित बातम्या