गोव्यात परराज्यातील नागरीकांच्या लसीकरणाचा मुद्दा तापला...

 Vijay sardesai.jpg
Vijay sardesai.jpg

फातोर्डा: मडगावच्या (Margoa) आरोग्य केंद्रावर जाऊन तेथील कोविड लसीकरण (Covid-19 Vaccination) फार्मस्युिटकल कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी (Worker) बंद करावे असे सांगणे म्हणजे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) हे वैफल्यग्रस्त व निराश झाले आहेत हे दिसून येते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्य सचिव व फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांनी केली आहे. (Damu Naik criticized Vijay Sardesai)

वेर्णा येथील फार्मस्युिटकल कंपनीत काम करणारे कमीत कमी तीन ते चार हजार कर्मचारी फातोर्ड्यात राहतात. ते येथे कित्येक वर्षांपासून राहतात व लसीकरण ही राष्ट्रीय  मोहीम असल्याने लसीकरणासाठी नोंदणी झालेल्यांना ते परराज्यातील म्हणून त्यांना परत पाठवता येत नसल्याचेही नाईक यांनी 
सांगितले. 

फार्मास्युटीकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्यात येते हे सरदेसाईंना कळत नाही याचे आश्र्चर्य वाटते. ते लोकांपर्यंत चुकीची माहिती पुरवित आहेत. शिवाय मडगाव आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाचे काम व्यवस्थितपणे चालू आहे. येथील कर्मचारी आपले काम अविरत व पद्धतशीरपणे करीत आहेत. गेल्या चार दिवसांत या केंद्रामध्ये 960 जणांचे लसीकरण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार म्हणून सरदेसाई अपयशी ठरले आहेत. त्यांना मतदारसंघातील लोकांना नोकऱ्या देणे शक्य झाले नाही. शिवाय बस स्टॅण्डची दुरुस्ती, सोनसोडो कचरा प्रश्र्न त्यांना सोडविता आलेला नाही. फातोर्ड्यामध्ये एकही योजना कार्यान्वित झाली नसल्याचेही नाईक यांनी सांगितले.

'फार्मास्युटिकल कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला विरोध नाही’
गोवा फॉरवर्ड पार्टीचे फातोर्डा ब्लॉक अध्यक्ष पीटर फर्नांडीस यांनी सांगितले, की आमचा फार्मास्युटिकल कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला मुळीच विरोध नाही, पण त्यांच्यासाठी वेर्णा येथे लसीकरण केंद्र उघडावे ही आमची मागणी आहे. तसे केल्यास फातोर्डा व मडगावमधील जास्त लोकांना लसीकरणाची संधी मिळेल असे आमचे मत आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारला सूचना केली आहे, की लसीकरण हे प्रत्येक मतदारसंघातील मतदान केंद्रावर करावे, जेणेकरून लसीकरण गतीने होईल, असेही फर्नांडिस यांनी सांगितले.

आम्ही कोणाचेही लसीकरण बंद केलेले नाही - डॉ. अंजु खरंगटे
मडगाव नागरी आरोग्य केंद्र इमारतीतील एका खांबावर  ‘फर्मासिटीकल कंपन्यांसाठीचे लसीकरण पुढील सूचना येईपर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहे.’ असा कागद चिकवटलेला आहे व हा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. यासंबंधी केंद्राच्या प्रमुख डॉ. अंजु खरंगटे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की, हा कागद आम्ही चिकवटलेला नसून आम्ही कोणाचेही लसीकरण बंद केलेले नाही व तसा अधिकार आम्हाला नसल्याचे त्या म्हणाल्या. आमचे येथील कर्मचारी सुटी न घेता लसीकरणाचे काम प्रामाणिक व पद्धतशीरपणे करीत आहेत. या कागदासंबंधी आपल्याला आणखी काहीच बोलायचे नाही.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com