Sanguem IIT controversy: सांगे आयआयटीची धग शमेना; आता दांडो ग्रामस्थांचा प्रकल्पाविरोधात एल्गार

गोवा सरकार आपली भुमिका बदणार का ?
IIT Goa in Sanguem
IIT Goa in SanguemDainik Gomantak

सांगे आयआयटी प्रकल्पाला विरोध ही बाब आता गोवेकरांसाठी नवी राहीलेली नाही. पिढ्यान पिढ्या आमच्याकडे असलेली जमिन हिरावण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगे ग्रामस्थांचे मत आहे. तर गोवा सरकार गोवा विकासात सांगे आयआयटी प्रकल्प महत्त्वाची भुमिका बजावणार असल्याने तो पुर्ण होणे आवश्यक असल्याचं म्हटले आहे. यातच आता नागरीकांचा विरोध वाढतो आहे.

(Dando Vorcotto farmers protest against the IIT project)

IIT Goa in Sanguem
Rajesh Faldessai on Goa Dairy: दुष्काळात तेरावा...; गोवा डेअरीने 10 कामगारांना दिला नारळ

सांगे आयआयटी प्रकल्पाचा धगधगता प्रश्न दिवसें- दिवस कमी होण्याऐवजी वाढत असल्याची स्थिती आहे. कारण आता सांगे क्षेत्र परिसरातील नागरीकांनी विरोध केला आहेच. सोबत आसपासच्या नागरीकांनी ही विरोध सुरु केला आहे. आज सांगे शेजारी असणाऱ्या दांडो नागरीकांनी ही एकत्र येत विरोध केला आहे.

IIT Goa in Sanguem
Accident In Farmagudi: फार्मगुडी येथे कंटेनरला अपघात! बायपास रोडवरील तीक्ष्ण वळणे म्हणजे मृत्यूचा सापळा

दांडो (Dando) नागरीकांनी विरोध करताना म्हटले आहे की, हा प्रकल्प केवळ सांगेच्या हद्दीत होणार असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही मात्र तो दांडोच्या परिसरात येणार असेल तर आमचा विरोध असेल असे म्हटले आहे. त्यामुळे दांडो नागरीकांनी आपल्या क्षेत्रासाठीची भुमिका घेतली आहे. मात्र सांगे आयआयटी प्रकल्पाला विरोध असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे गोवा सरकार आपली भुमिका बदणार की, आहे तीच ठेवणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com