धोका वाढतोय, आणखी चार बळी

Tejshri Kumbhar
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

कोरोनाचा विषय अधिकच गंभीर होत चालला असून मंगळवारी आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. मृतांत आल्तिनो येथील २९ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७९ वर्षीय महिला, मडगाव येथील ५४ वर्षीय पुरुष आणि घोगळ मडगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या चौघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाल्याची माहिती देण्यात आली.

तेजश्री कुंभार

पणजी :

आजवर राज्यात एकूण ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत २५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर २३८ जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. एकूण १९०१ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. तसेच चोवीस तासांत राजधानी पणजीत १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्‍याने लोकांत घबराट निर्माण झाली आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी १९ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ६७ जणांना ठेवण्यात आले. १८८३ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २२९६ जणांचे अहवाल हाती आहेत. तर ५७० जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १२ रुग्ण आहेत. डिचोलीत १२, साखळीत ५८, पेडणेत २६, वाळपईत ५८, म्हापसा येथे ६७, पणजीत ७८, बेतकीत २२, कांदोळीत ४५, कोलवाळ येथे ३७, खोर्लीत ३०, चिंबल येथे ९८, पर्वरीत ३८, कुडचडेत २६, काणकोणात ८, मडगावात ११४, वास्कोत ३८९, लोटलीत २४, मेरशीत २८, केपेत ३०, शिरोड्यात ३३, धारबांदोड्यात ३८, फोंडा ११४, नावेलीत ३७ रुग्ण आहेत.
 
संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या