धोका वाढला..गोव्‍यातील कोरोना बाधितांचा आकडा सातवर?? एक चाचणी पॉझिटिव्‍ह, दुसरी चाचणी सुरु

dainik gomantak
बुधवार, 13 मे 2020

मिळालेल्‍या माहितीनुसार, यामध्‍ये ५ जण मुंबई येथून आलेले असून एका कुटुंबातील आहेत. यातील एकजण ड्रायव्‍हर आहे.

पणजी, 
तासाभरापुर्वी राज्‍यात कोरोनाचा एक रूग्‍ण साडपला असल्‍याची माहिती मिळाली होती. मात्र कोरोना बाधितांचा आकडा आता ७ वर पोहचण्‍याची शक्‍यता  असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍यातील सुत्रांनी दिली. या रुग्‍णांची रॅपिड सॉफ्‍ट टेस्‍टिंग चाचणी पॉझिटिव्‍ह आली असून दुसरी चाचणी सुरू आहे. त्‍यामुळे पुढे काय होणार याची चिंता लोकांत वाढली आहे. लोकांच्‍यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गोवा सरकार अद्यापही अधिकृत माहिती देण्‍यास  तयार नाही. 
मिळालेल्‍या माहितीनुसार, यामध्‍ये ५ जण मुंबई येथून आलेले असून एका कुटुंबातील आहेत. यातील एकजण ड्रायव्‍हर आहे. या सर्वांची बॉर्डरवरच तपासणी केल्‍याने हे सत्‍य समोर आले आहे. राज्‍य सरकारने आता गंभीर होणे आवश्‍‍यक असून राज्‍यातील टाळेबंदी कडक करणे आवश्‍‍यक आहे. 

संबंधित बातम्या