धोका वाढला..राज्‍यात कोरोनाचे तीन रूग्‍ण. दोघांचे व्‍हायरॉलॉजी लॅबमधील अहवालही पॉझिटिव्‍ह, एकाचा अहवाल प्रतीक्षेत

dainik gomantak
शनिवार, 16 मे 2020

रूग्‍ण गोव्‍यातीलच असून ने कोलकत्त्‍याला गेले होते.

पणजी,
गोव्यात कोरोनाच्‍या तीन रूग्‍णांची भर पडली आहे. या तिघांच्‍या ट्रुनेट रॅपीड कोरोना पडताळणी चाचण्‍या पॉझिटिव्‍ह आल्‍यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील व्‍हायरॉलॉजी लॅबमध्‍ये चाचणीसाठी पाठविलेल्‍या नमुन्‍यात यातील दोघांच्‍या चाचण्‍या पॉझिटिव्‍ह आल्‍या. एकाची चाचणी पुढील ७२ तासात पुन्‍हा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दिली. राज्‍यात सध्‍या कोरोनाग्रस्‍तांची संख्‍या १० वर पोहचली असून एकाचा अहवाल प्रतिक्षेत आहे.  
सविस्‍तर माहिती असे की, रूग्‍ण गोव्‍यातीलच असून ने कोलकत्त्‍याला गेले होते. राज्‍यात येताना परतल्‍यानंतर त्‍यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्‍ह आली आहे. आतातरी गंभीर होत टाळेबंदीचे नियम कडक करणे गरजेचे आहे. 

संबंधित बातम्या