नदीवरील बंधाऱ्याच्या उंचीमुळे मातीच्या घरांना धोका

मातीची 18 घरे आहेत त्यांना धोका उद्‍भू शकतो असे मत आमदार (MLA) ढवळीकर (Dhavalikar) यांनी व्यक्त केले.
नदीवरील बंधाऱ्याच्या उंचीमुळे मातीच्या घरांना धोका
नदीवरील उंच बंधारा Dainik Gomantak

पणजी: कुर्टी - खांडेपार येथे खांडेपार नदीवर (River) बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे (agriculture) तसेच घरांचे नुकसान झाले आहे. हा बंधारा कोणत्याही परवान्याशिवाय मोठी उंची देऊन बांधण्यात येत असल्याने तो आजुबाजूच्या मातीच्या असलेल्या घरांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे असा प्रश्‍न मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज शून्यतासावेळी विधानसभेत मांडला. यावर जलस्रोतमंत्री (Minister of Water Resources) फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी नोंद घेतली असून लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला जलस्रोत खात्याने दिलेल्या माहितीनुसार हा बंधारा बांधण्यात येत आहे तेथे सुमारे 4 मीटर पाण्याची उंची वाढली व काही घरे बुडाली. या बंधाऱ्याला पंचायतीकडून (Panchayat) परवानगी नाही. त्यामुळे या ठिकाणी मानवनिर्मित आपत्ती (Disaster) होण्याचा संभव आहे.

नदीवरील उंच बंधारा
स्थलांतरीत चिंबल आरोग्य केंद्र पूर्वीच्या ठिकाणी सुरू करा; फर्नांडिस

गांजे - उसगाव येथेही काम सुरू आहे. त्या ठिकाणची सुमारे 4 घरे जमीनदोस्त झाली आहेत. सध्या तेथे 18 घरे मातीची आहेत त्यांना धोका उद्‍भू शकतो असे मत आमदार(MLA) ढवळीकर (Dhavalikar) यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com