महामार्ग पार करणे ठरतेय धोकादायक

सदोष कामाचा फटका : करासवाडा (Karaswada) येथे पादचाऱ्यांची कुचंबणा; निवारा शेडचा पत्ता नाही
महामार्ग पार करणे ठरतेय धोकादायक
करासवाडा (Karaswada) येथे औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेला राष्ट्रीय महामार्ग (National Highways) पार करणे पादचाऱ्यांना सध्या ठरतायेत धोकादायक.Dainik Gomantak

म्हापसा: करासवाडा (Karaswada) येथे औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेला राष्ट्रीय महामार्ग (National Highways) पार करणे पादचाऱ्यांना सध्या धोकादायक ठरले आहे. या महामार्गावरून दोन्ही बाजूंनी भरधाव गतीने वाहनांची ये-जा सुरू असल्याने तो महामार्ग पार करणे प्रवाशांच्या दृष्टीने जीवघेणे ठरलेले आहे.

करासवाडा (Karaswada) येथे औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेला राष्ट्रीय महामार्ग (National Highways) पार करणे पादचाऱ्यांना सध्या ठरतायेत धोकादायक.
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण, न्यायालयाची राज्य सरकारला तंबी

महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या बसथांब्यांच्या बाजूला निवारा शेडची सोय न केल्याने प्रवाशांना बससाठी नाइलाजाने रस्त्यावरच उभे राहावे लागते. तेथूनच भरधाव वाहने येत असल्याने त्या प्रवाशांच्या जीवितास संभाव अपघातामुळे धोका निर्माण झालेला आहे.

बाजूलाच औद्योगिक वसाहत असल्याने तेथील दोन्ही बसथांब्यांवर प्रतिदिन हजारो कर्मचारी बसच्या प्रतीक्षेत उभे असतात. तेथील रस्ता अनेक ठिकाणी खडबडीत झालेला असल्याने लोक वाकड्या तिकड्या पद्धतीने वाहने कशीही चालवत असतात. त्याशिवाय काही वाहनचालक बेजबाबदारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवत असतात.

करासवाडा (Karaswada) येथे औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेला राष्ट्रीय महामार्ग (National Highways) पार करणे पादचाऱ्यांना सध्या ठरतायेत धोकादायक.
मुंबई-गोवा महामार्ग-लोहमार्ग बंद पडतो तेव्हा...

पेडे येथील जंक्शनवहरी अशाच स्वरूपाची समस्या भेडसावत असल्याची माहिती कामरखाजन, आकय व पेडे भागातील रहिवाशांनी दिली. या ठिकाणी नियोजित उड्डाणपूल व अंडरपास कार्यान्वित झाल्यानंतरच ही समस्या आटोक्यात येणार आहे.

करासवाडा येथील हमरस्त्याच्या परिसरात पुरेशा प्रमाणात सूचना फलक नाहीत. शिवाय वाहतूक पोलिसांची व्यवस्था तिथे करण्यात आली नाही. त्यामुळे त्या भागात रहदारीबाबत गोंधळाचे वातावरण असते. तसेच तिथे असलेल्या पेट्रोल पंपावर जाणाऱ्या व त्यानंतर तेथून बाहेर पडून हमरस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे या गोंधळात आणखीन भर पडत असते.

- शेखर नाईक, सामाजिक कार्यकर्ता

महामार्गावरच वाहनदुरुस्ती!

काही अवजड वाहने महामार्गावरच उभी करून तिथे असलेल्या मॅकेनिकच्या साहाय्याने ती दुरुस्त केली जातात. त्यामुळे या महामार्गावरील रहदारीचा प्रश्न अधीक जटिल होत असतो. सर्वच वाहने एकाच ठिकाणी कशी काय बंद होतात व लोकांना त्रास होईल अशा परिस्थितीत तिथे वाहनदुरुस्ती कशी काय केली जाते, याबाबत वाहतूक पोलिसांनी चौकशी करून पोलिस व अन्य शासकीय यंत्रणांच्या साहाय्याने संबंधित मॅकेनिकवर कारवाई करावी, अशी मागणी औद्योगिक वसाहतीतील प्रवाशांनी केली आहे.

काही वाहने प्रवेश निषिद्ध असलेल्या मार्गावरून जात असतात; पण, त्या वाहनचालकांवर कुणीही कारवाई करीत नाही. तसेच, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपाहारगृहे व अन्य दुकाने असल्याने कित्येक वाहनचालक स्वत:ची वाहने मुख्य रस्त्यावर उभी करून तिथे जात असतात.

- सूर्यकांत चोडणकर, म्हापशातील नागरिक

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com