मये-पैरा रस्ता वाहतुकीस धोकादायक
रस्त्यावरील माती आणि दलदलीमुळे सध्या मये-पैरा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. Dainik Gomantak

मये-पैरा रस्ता वाहतुकीस धोकादायक

सध्या पावसाने (Rain) पुन्हा कहर केला असून, गेल्या सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे मये-पैरा भागात काही ठिकाणी चरातील माती रस्त्यावर वाहून येत आहे.

डिचोली: सध्या पडणाऱ्या पावसामुळे (Rain) मयेत खोदलेल्या चरातील माती रस्त्यावर पसरली असून, काहीठिकाणी मातीची चिखलमय दलदल निर्माण झाली आहे. रस्त्यावरील माती आणि दलदलीमुळे सध्या मये-पैरा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे (Public Works Department) मये भागात नवीन जलवाहिनी टाकण्याची योजना असून, गेल्या आठवड्यापासून हे काम सुरु झाले आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी मये-पैरा रस्त्याच्या बाजूने चर खोदण्यात येत आहेत. काही ठिकाणी पाईप टाकून चर बुजविण्यात आले असले, तरी ते व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. तर काहीठिकाणी चरातील माती रस्त्यावरच आहे. त्यातच पावसाच्या कहरामुळे या रस्त्यावर सध्या समस्या निर्माण झाली आहे.

रस्त्यावरील माती आणि दलदलीमुळे सध्या मये-पैरा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
Goa: कुठ्ठाळीमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते; नागरिकांची गैरसोय

पावसामुळे चिखल

सध्या पावसाने पुन्हा कहर केला असून, गेल्या सलग तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे मये-पैरा भागात काही ठिकाणी चरातील माती रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूने बुजविलेले चर काही ठिकाणी खचले आहेत. यामुळे हा रस्ता सध्या वाहतुकीस धोकादायक बनत आहे. या रस्त्यावरुन दुचाकी वेगाने हाकल्यास घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावरच चर

दरम्यान, जलवाहिनी टाकण्याचे काम जोरात सुरु असले, तरी काहीठिकाणी भर रस्त्यावरच जेसीबी यंत्राच्या मदतीने चर खोदण्यात आले आहेत. याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com