डिचोलीत वॉकिंग ट्रॅकवर पसरतोय अंधार

या ट्रॅकवर महिलांचा वावर असतो. मात्र अंधाराचा फायदा घेत एखादेवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Darkness spreads on walking track in bicholim
Darkness spreads on walking track in bicholim Dainik Gomantak

डिचोली: शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या वॉकिंग ट्रॅकवरील काही पथदीप पेटत नसल्याने या वॉकिंग ट्रॅकवर काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरते. शहरातील जुना पूल ते गावकरवाड्या पर्यंत नदीकाठी बांधण्यात आलेला हा बांध वजा वॉकिंग ट्रॅक म्हणजे अनेकांचे विरंगुळ्याचे तसेच पायपीट करण्याचे ठिकाण बनले आहे. हा प्रकल्प झाल्यापासून दरदिवशी सकाळ संध्याकाळी या ट्रॅकवर पायपीट करण्यासाठी पुरुषांसह महिला मिळून शेकडो नागरिक येतात. 'कोविड' मुळे मध्यंतरी काही महिने या वॉकिंग ट्रॅकवर सामसूम पसरली होती. मात्र आता पुन्हा या ट्रॅकवर नागरिकांचा वावर वाढला आहे. पुरुषांसह महिला संख्या बरेचजण सायंकाळी उशिरापर्यंत या वॉकिंग ट्रॅकवर येरझारा घालून पाय मोकळे करतात. मात्र ट्रॅकवर मधे-मधे पथदीप पेटत नसल्याने रात्रीच्यावेळी मोठी समस्या निर्माण होत असते.

Darkness spreads on walking track in bicholim
'आर्थिक डबघाईला आलेल्या पालिकांना सरकारी अनुदान द्या'

नागरिकांत भीती

या ट्रॅकवर महिलांचा वावर असतो. मात्र अंधाराचा फायदा घेत एखादेवेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच या ट्रॅकवर यापूर्वी साप फिरताना आढळून आले होते. तर गेल्या जुलै महिन्यात नदीकाठी मगर पकडण्यात आली होती. यामुळे भीती व्यक्त होत आहे. काहीनी तर रात्री ट्रॅकवर फिरकण्याचे सोडून दिले आहे. मधेमध्ये अंधार पसरत असल्याने रात्रीच्यावेळी ट्रॅकवर मनमोकळे फिरायला भीती वाटते. असे काही नागरिकांनी सांगितले.

दहा पथदीप नादुरुस्त

पूल ते गावकरवाडापर्यंतच्या वॉकिंग ट्रॅकवर 31 पथदिपांची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 31 पैकी दहा पथदीप नादुरुस्त आहेत. नादुरुस्त पथदीप एकतर दुरुस्त करावेत नपेक्षा नवीन पथदीप बसवावेत. अशी नागरिकांची मागणी होत आहे.

Darkness spreads on walking track in bicholim
गोवा पोलीस महासंचालकपदी आय. डी. शुक्ला यांची नियुक्ती

नागरिकांसाठी वरदान

वॉकिंग ट्रॅक म्हणजे शहरवासियांना वरदान ठरलेला आहे. महिला, वृद्ध मिळून शेकडो नागरिक नियमितपणे वॉकिंग ट्रॅकवर पाय मोकळे करण्यासाठी येतात. वॉकिंग ट्रॅकवर मनमोकळे फिरण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षितेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

-राहूल कवळेकर, नागरिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com