गोव्यातील 5 महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

राजधानी पणजी मधील 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सांगे, केपे, मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या पालिकांच्या निवडणूक होणार आहेत.

पणजी: गोव्यातील 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या निवडणूक 23 एप्रिल रोजी होणार असल्याची   माहिती आज निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमण  यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.दरम्यान या निवडणुकांचा निकाल 26 एप्रिल रोजी लागणार असल्याचे समजते. (Date of 5 municipal elections in Goa announced by election commission.)

नुकत्याच गोव्यात महानगर पालिका निवडणूक पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी मिळवली आहे. त्यातच आता सांगे, केपे, मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या पालिकांच्या निवडणूक होणार आहेत. 23 एप्रिल रोजी या सर्व निवडणूका पार पडणार असून, 26 एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती आज डब्ल्यू. व्ही.रमण यांनी दिली. 

गोवा विधानसभा: कोळसा खाणीच्या संदर्भात विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे -

मागील महिन्यात 20 मार्च  रोजीच या निवडणुका पार पडणार होत्या मात्र प्रभाग रचनेत बदल झाल्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे हे प्रकरण आधी उच्च न्यायालय (High court)  गेले होते, त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा पोहोचले होते. दरम्यान 30 एप्रिल रोजी या निवडणूक घेण्यात याव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते.  

गोवा विधानसभा: कोळसा खाण आणि म्हादई नदी प्रश्नावरून विरोधी नेते आक्रमक 

संबंधित बातम्या