कोट्यवधीचा महसूल मिळवून देणाऱ्या ‘सनबर्न’ची तारीख जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

राज्यातील कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक'' कार्यक्रम तथा ‘सनबर्न'' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत.

पणजी : राज्यातील कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक'' कार्यक्रम तथा ‘सनबर्न'' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या आदल्या काही दिवसांत हा कार्यक्रम होणार आहे. 
देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या ‘सनबर्न'' या कार्यक्रमाची तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते. प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम गोव्यात होतो आणि राज्य सरकारला या कार्यक्रमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. डिसेंबर महिन्यात २७ ते २९ रोजी हा कार्यक्रम होणार असून, लवकरच हा कार्यक्रम आयोजकांकडून त्यांच्या तिकीट बुकिंगला सुरवातही होणार आहे. 

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक पर्यटक गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी येतात आणि पाच-सहा दिवस मुक्काम करून नव्या वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घराकडे परतत असतात. यात युवा वर्गाची मोठी संख्या असते, हीच संख्या अशा संगीतमय कार्यक्रमांना गर्दी करीत असते. राज्यात या कार्यक्रमाची जाहिरातबाजी जास्त होत नाही, पण इतर राज्यांत मात्र या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात संबंधित कंपन्यांकडून जाहिरातबाजी केली जाते. त्यामुळे परराज्यातील युवा वर्गाला या कार्यक्रमात वळविण्यासाठी हे माध्यम वापरले जाते. आता त्यात समाजमाध्यमांचीही भर पडली आहे. जाहिरातबाजीमुळेच कानाकोपऱ्यातून युवा वर्ग गोव्यात दाखल होतो. 

एसओपीकडे लक्ष
राज्यात नुकत्याच नाईट क्लबचा प्रकार उघडकीस आला होता. त्यातून कोणतेही सामाजिक अंतर किंवा आरोग्य खात्याच्या नियमांचे पालन केले गेले नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सरकारी पातळीवर देण्यात आल्या. सनबर्नला एका दिवशी हजारो लोक एकत्र येतात, त्यामुळे त्याठिकाणी सामाजिक अंतर राखले जाणार का? असा प्रश्‍न आहे.

संबंधित बातम्या