दत्तप्रसाद नाईकांची गोवा भाजपच्या 'प्रवक्ते' पदावरून मुक्तता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या जबाबदाऱ्यासंदर्भात पुनर्बांधणी करताना दत्तप्रसाद नाईक यांना  पक्षाच्या 'प्रवक्ता' या जबाबदारीतून मुक्त करण्यात येत आहे.

पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या जबाबदाऱ्यासंदर्भात पुनर्बांधणी करताना दत्तप्रसाद नाईक यांना  पक्षाच्या 'प्रवक्ता' या जबाबदारीतून मुक्त करण्यात येत आहे. "भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तप्रसाद नाईक यांना पक्षाच्या प्रवक्त्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा हा पक्षाचा निर्णय आहे. त्याच्याशी काही राजकारण नाही. ते पक्षाचे नेते आहेत. त्यांना पक्षातून काढण्यात आलेले नाही. त्यांच्या पत्नी शीतल नाईक या पक्षाच्या महिला मोर्चाच्याअध्यक्षा आहेत", असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दत्तप्रसाद नाईक यांना पक्ष प्रवक्ता पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याच्या तडकाफडकी निर्णयाबाबत विचारले असता केले. 

गोवा पालिका निवडणूकीच्या शेवटच्या दिवशी 381 उमेदवारी अर्ज दाखल

ज्येष्ठ भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांनी भाजप समर्थक आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या ‘टुगेदर फॉर अ प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनलमधील उमेदवारांविरुद्ध काही भाजपच्याच उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्याला वैयक्तिक पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या पणजी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध भाजप असे चित्र दिसू लागले आहे. नाईक यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना भाजपच्या पॅनलमध्ये स्थान न दिल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. पक्षाने त्यांना प्रवक्ता पदावरून काढताना इतर जे कोणी पक्षविरोधात कारवाया करत असतील त्यांना अप्रत्यक्षणपणे संकेत दिले आहेत.यासंबंधीचा आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दयानंद शेट तानावडे यांनी आज काढला आहे.

May be an image of text that says "Bharatiya Janata Party Pradesh गोमनतक មंលंगेको Date: 05-03-2021 Dear Shri Dattaprasad Naik, view the reconstitution of the responsibilities, you are hereby relieved the Spokesperson the ha Janata Party, Goa Pradesh. Sadanand Shet Tanavade State President To, Shri Dattaprasad Madhukar Naik, H.No 3-G-1. Kamat Tonca, Caranzalem, liswadi Goa 403 002"

पणजी महापालिकेसाठी भाजप समर्थक आमदार बाबूश मोन्सेरात यांचे टुगेदर फॉर प्रोग्रेसिव पणजी या पॅनेल उमेदवाराविरोधात स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केल्याने दत्तप्रसाद नाईक यांचे पक्षाचे प्रवक्ते म्हणून पद काढण्यात आले आहे.

"अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्होंचा राजकीय गेम करण्याचा काॅंग्रेस नेत्यांचा डाव": विनय तेंडुलकर

संबंधित बातम्या