Davorlim Murder Case: सादिक बेळ्‍ळारी हत्या प्रकरणातील सहावा आरोपी पोलिसांच्या ताब्यात...

कबीर खानजादे असे सहाव्या आरोपीचे नाव आहे
Davorlim Murder Case
Davorlim Murder CaseDainik Gomantak

Davorlim Murder Case: 1 सप्टेंबरला घरात इतर कुणीच नसल्याचे लक्षात घेत, रुमडामळ-दवर्ली येथील सादिक बेळ्‍ळारीचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते.

त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आजपर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेतले. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या खुनातील सहाव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

Davorlim Murder Case
Calangute Mobile Theft: रेस्टॉरंटमधील कामगारांचे फोन लंपास! पोलिसांनी आवळल्या प. बंगालमधील दोघांच्या मुसक्या

सहावा आरोपी पोलिसांच्या ताब्यात....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कबीर खानजादे असे सहाव्या आरोपीचे नाव आहे. रुमडामळ-दवर्लीमध्ये झालेल्या सादिकच्या खुनात आजपर्यंत पोलिसांनी कादर खान, तौसिफ कडेमणी, जावेद पानवाले, सुलेमान आणि जावेदचा भाऊ रियान अशा पाच जणांना अटक केली होती.

यामध्ये महत्वाची माहिती अशी की, अजून एका व्यक्तीचा या खुनामध्ये सहभाग असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अशी केली सादिकची हत्या...

शुक्रवारी (1 सप्टेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सादिकचे आई-वडील घरातून बाहेर पडल्यानंतर तो घरी एकटाच असल्याचे पाहून मारेकरी घरात शिरले आणि सादिकच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले.

तो झोपलेला असल्याने त्याला या हल्ल्याचा प्रतिकार करता आला नाही. ज्यामुळे तिथेच त्याची प्राणज्योत मालवली.

सादिक 2 महिन्यापूर्वीच रुमडामळमधील मुझाहिद खान याच्या हत्येच्या आरोपातून जामिनावर बाहेर पडला होता. त्यावेळी मुझाहिदच्या भावाने सादिकला जीवे मारण्याची धमकी दिली होती. शेवटी भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या टोळीने सादिकचा काटा काढण्याचे ठरवले आणि नियोजन करून त्याची हत्या केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com