'दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा पर्दाफाश'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

गोवा सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे 2198 बोगस लाभार्थी सरकारने शोधून काढले आहेत.

पणजी : गोवा सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे 2198 बोगस लाभार्थी सरकारने शोधून काढले आहेत. या योजनेतून दर महिन्याला थेट आर्थिक मदत समाजकल्याण खात्याकडून दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना विशेष करून ही मदत दिली जाते याशिवाय दिव्यांग कोणताही आधार नसलेले अशा व्यक्तींना ही मदत दिली जाते. सरकारने अशी मदत मिळवणारे आर्थिक दृष्ट्या कमकुवत  घटकातील आहेत का याची पडताळणी करणे सुरु केले होते.

गोवा विधानसभा अधिवेशन: "विरोधकांनी विधानसभेत भाजप पक्षावर केली ती..

तालुकावार अशी पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनंतर काही जणांना नव्याने कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. 2198 जण खात्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. यामुळे अशांची नावे आता समाजकल्याण खात्याने लाभार्थ्यांच्या यादीतून वगळली आहेत.

संबंधित बातम्या