Goa Lockdown: पर्यटकाचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद; हॉटेलमध्येच करावा लागणार मुक्काम

Goa Lockdown: पर्यटकाचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद; हॉटेलमध्येच करावा लागणार मुक्काम
On the days of the lockdown Goa tourists will have to stay in hotels

पणजी: देशभरात वाढत असलेला कोरोनाव्हायरसा वाढता कहर बघता गोवा सरकारने बुधवारी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला. 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत  5 दिवसाचा लॉक़ाउन गोव्यात जाहीर केला आहे. गोवा परिसर 5 दिवस पूर्णत: बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावला गेला आहे. मात्र गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचं काय गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. गोवा राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आणि गोव्याची अर्थव्यवस्थाही पर्यटनावर अवलंबून आहे.

राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांचे काय?

शेजारील राज्यांमधून गोव्यात येणार्‍या वाहनांना प्रवेशास बंदी घातलेली नाही. मात्र या लॉकडाउनच्या दिवसात पर्यटकांना हॉटेलमध्येच राहाव लागणार आहे. या 5 दिवसात गोव्यात असणाऱ्या सर्व पर्यटकांना त्यांच्या हॉटेल्समध्येच राहावं लागत आहे. त्यांना बाहेर जाऊन गोव्यातील पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही. 

गोव्यात किती दिवस लॉकडाउन आहे?

गोव्यात काल गुरूवारपासून कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. आणि गोयेंकरांनी या लॉकडाउन ला चांगला प्रतिसाद दिला आहे.  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाची संख्या थांबवण्यासाठी गोव्यात 5 दिवसाचाा लॉकडाउन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय सुरू राहणार?

सावंत यांनी याबाबबत स्पष्टीकरण दिले आहे.  किराणा दुकाने दिवसभर खुली राहणार आहे. उद्योगांना त्यांच्या आवारातच काम करण्याची मुभा देण्यात आली. गोव्यातून कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या आणि आणि गोव्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतुकीच्या सुविधां सुरू राहणार आहे मात्र त्यांना RTPCR टेस्ट करावी लागणार आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालये खुली राहणार आहे आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा अखंडितपणे सुरू राहतील.

रेस्टॉरंट्स खुली आहेत का?

रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरांना खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेलमध्ये जेवण करता येणार नाही. तेव्हा पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. बार आणि रेस्टॉरंट्स ज्यांना आतापर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू असण्याची  परवानगी होती, ते लॉकडाऊनच्या दिवसात बंद राहणार आहे.

काय बंद राहील?

सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान कॅसिनोसह पर्यटन क्रू देखील बंद ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान गोव्याचd/e वेगवेगळ्या भागातील साप्ताहिक बाजार भरणार नाही. त्यामुळे पर्यटकांना खरेदी ही करता येणार नाही.

सार्वजनिक कार्यक्रमांचे काय?

गोवा सरकारने लोकांना यापूर्वी राज्यात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याी परवाणगी  दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या लॉकडाऊन नंतर या 5 दिवसाच्या दरम्यान होणाऱ्या विवाहसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com