Goa Crime: करंझाळे किनाऱ्यावर आढळला बेवारस मृतदेह; हत्येचा संशय

मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट
Caranzalem
CaranzalemDainik Gomantak

करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर आज एक बेवारस मानवी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवल्याने घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले आहेत. तसेच घटनेचा पंचनामा सुरु आहे.

(Dead body found in Caranzalem beach Police reached the spot )

Caranzalem
Traffic Jam in Panaji : Ironman 70.3 साठी वाहतुकीत बदल; शहरात 'ट्रॅफिक जॅम'

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास करंझाळे समुद्रकिनाऱ्यावरुन स्थानिक नागरीक जात असताना त्यांना मानवी देहाचे काही अवशेष आढळले. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली असल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.

Caranzalem
Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा घातपाताचा प्रकार असून खुनातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.सध्या विशेष पथकाच्या आधारे मृतदेह ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेहाची ओळख पटण्यासाठी तपास पथके कार्यरत झाली आहेत. त्यामुळे घटनेचा उलघडा होण्यास मदत होणार असल्याचं पोलिस कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com