Goa: कळंगुट बागा येथे जीवघेणे खड्डे

बुधवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स (Shawn Martins) यांची भेट घेत घटनेची माहिती त्यांना दिली व तात्काळ तेथील खड्डा बुजविण्याची मागणी केली.
Goa: कळंगुट बागा येथे जीवघेणे खड्डे
कळंगुट बागा येथील रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डाDainik Gomantak

शिवोली - कळंगुट - बागा (Calangute and Baga) येथील मुख्य रस्त्यावर महिन्याभरापुर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खोदण्यात आलेला खड्डा अर्धवट बुजलेल्या अवस्थेत सोडून देण्यात आल्याने सध्या त्याचे रुपांतर विहीर सद्रुश्य झाले आहे. सुरुवातीला सदर खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेकांच्या दुचाक्या खड्ड्यात पडून त्यांना मुका मार बसल्याच्या तक्रारी आहेत. याभागातील पाण्याची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता परंतु त्यानंतर खोदलेला खड्डा पुर्णपणे न बुजवता तो अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळेच रस्त्याला भगदाड पडल्याचे ग्रांमस्थांनी सांगितले, तथापि, कालपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खड्डा अधिकच खोलावला गेला आणी अपघातांना आमंत्रण मिळाले. (Deadly potholes on the road at Calangute and Baga)

कळंगुट बागा येथील रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डा
Goa: कोरोनाने घालून दिलेले धडे

दरम्यान, बुधवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स (Shawn Martins) यांची भेट घेत घटनेची माहिती त्यांना दिली व तात्काळ तेथील खड्डा बुजविण्याची मागणी केली. ग्रांमस्थांच्या तक्रारीची दखल घेत सरपंच शॉन मार्टीन्स यांनी घटनास्थळाला भेट देत पाहाणी केली व प्रकरण स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबोंच्या कानावर घातले. सरतेशेवटी मंत्री लोबो यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावून घेत तो जीवघेणा खड्डा बुजविण्याचे आदेश दिले, बुधवारी संध्याकाळी उशिरा पर्यत खड्डा बुजविण्याचे काम सुरु होते. राज्यात जोरदार सततधार बरसणाऱ्या पावसामुळे कळंगुट पाठोपाठ शिवोलीतील (Siolim) रस्त्यांचीही मर्यादेपेक्षा  चाळण झालेली असल्याने आठवडाभरात येथील रस्त्यांची  डागडुजी करण्यात न आल्यास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशारा स्थानिक रिव्होल्युशनरी गोवाच्या तरुणांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com