IVERMECTIN
IVERMECTIN

IVERMECTIN चा घोळ सुटेना; किटमधून दिल्या आयव्हर्मेक्टिन गोळ्या

पणजी: आयव्हर्मेक्टिन(Ivermectin tablet) गोळ्या खरेदी केल्याचा इन्कार मुख्यमंत्री प्रमोद सावंत(CM Pramod Sawant) यांनी केला होता. त्यानंतर गुरुवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे(Gomaco) डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी कोरोना रुग्णांना किटमधून आयव्हर्मेक्टिन गोळ्या दिल्याची कबुली दिली. त्यामुळे गोळ्यांचा संभ्रम अजूनही सुटलेला नाही. जर गोळ्या खरेदी केल्याच नाहीत तर कोरोना रुग्णांच्या किटमध्ये त्या कशा आल्या? हा प्रश्‍न उपस्थित होत असून सरकार व आरोग्य यंत्रणा यांच्यात  सुरू असलेल्या सावळागोंधळाचे दर्शन गुरुवारी घडले. (Dean of Goa Medical College Dr Shivanand Bandekar confesses to giving corona patients ivermectin tablets from the kit) 

गोमेकॉच्या आवारात झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आयव्हर्मेक्टिनच्या गोळ्यांचा वापर गोव्यात झाल्याचे सांगितले. कोरोना रुग्णांच्या किटमधून त्या दिल्याचे ते म्हणाले. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की कोरोनावरील उपचार आणि औषधे बदलत आहेत. पूर्वी प्लाझ्मामुळे कोरोनाबाधित बरे होत होते. काही काळानंतर ते बंद झाले. आयव्हर्मेक्टिन गोळ्यांचे तसेच आहे. आता त्या उपचारातून काढल्या. पूर्वी होत्या. आम्हीही त्या आता हटवल्या आहेत, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यानी आयव्हर्मेक्टिनच्या खरेदीचा प्रस्ताव रद्द केला नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकार आणि आरोग्य खात्यात योग्य ताळमेळ नसल्याचे या प्रकरणावरून दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com