गोव्यातला कोरोना बळींचा आकडा ७०१ वर

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

राज्यात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर झालेल्या कोरोना बळींची संख्या संख्या ७०१ इतकी झाली आहे.

पणजी :  राज्यात आज तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर झालेल्या कोरोना बळींची संख्या संख्या ७०१ इतकी झाली आहे, दरम्यान आज ९० लोकांना कोरोनाची लागण झाली, तर १५४ लोक कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. आज मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील रिकव्हरी रेट ९५.९० टक्के इतका आहे. राज्यभरात १२९७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आज १०२ लोकांनी होम आयसोलेशनचा मार्ग उपचारासाठी स्वीकारला, तर इस्पितळात उपचार करण्यासाठी ४१ लोकांना भरती करून घेण्यात आले. पंधराशे पंच्याहत्तर कोरोना पडताळणी चाचण्या करण्यात आल्या.

 

आज ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यामध्ये ७८ वर्षीय पुरुष, हळदोणे येथील ७१ वर्षीय पुरुष आणि माजोर्डा येथील ७६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. यातील दोन मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि एक मृत्यू इएसआय इस्पितळात झाला आहे. 
राज्यातील उत्तर गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता २७५ खाटांची आहे. यातील २४५ खाटा सध्या रिकाम्या आहेत, तर दक्षिण गोव्यातील कोरोना केअर सेंटरची क्षमता ६० असून यातील ४६ खाटा रिकाम्या आहेत. सरकारकडे लोकांच्या उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.  

राज्यातील कोरोनाचे रुग्ण

  • पर्वरी - ८९, मडगाव - ११७, 
  • फोंडा - ६८,  वास्को - ६३, 
  • लोटली - ४७ पणजी - ७८, 
  • चिंबल - ५३

 

अधिक वाचा :

राजधानी पणजीत आंदोलनांचे पेव ; जीवरक्षक संघटनेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू 

कर्नाटकच्या कळसा-भांडुरामुळे निसर्गाचाही ऱ्हास ; राज्यातील पाणीपुरवठ्याबरोबरच वन्यजीव, वनस्पतीवरही परिणाम शक्य 

संबंधित बातम्या